Majalgaon APMC Election Result: आमदार सोळंकेनी माजलगावातही बाजी मारली; पुत्र वीरेंद्रचीही जोरदार एंट्री !

Bazar Market Commitee : माजलगाव बाजार समितीमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित आघाडीनं 18 पैकी 12 बारा जागा जिंकल्या.
Prakash Solanke
Prakash SolankeSarkarnama
Published on
Updated on

दत्ता देशमुख -

Beed News : जिल्ह्यातील माजलगाव, वडवणी, केज, अंबाजोगाई, परळी, बीड, गेवराई, कडा व पाटोदा या नऊ बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या आहेत. यातील ओपनिंगलाच वडवणी बाजार निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आणि आमदार प्रकाश सोळंके(Prakash Solanke) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने विजय मिळविला.

वडवणी बाजार समितीवर महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi)चे एकहाती वर्चस्व राखण्यात यश मिळवलेल्या राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत देखील यश मिळविले आहे. या निवडणूकीच्या माध्यमातून त्यांनी पुत्र वीरेंद्र सोळंके देखील राजकारणात आणले असून त्यांचाही विजय झाला.

Prakash Solanke
Jamkhed Bazar Samiti: राम शिंदे-रोहित पवारांमध्ये पुन्हा काँटे की टक्कर; कर्जतप्रमाणेच जामखेडलाही मिळाल्या समसमान जागा..

महाविकास आघाडीच्या पारड्यात शनिवारी गेवराई, अंबाजोगाई व परळी बाजार समित्या निकाल आला आहे. तर केवळ केज बाजार समिती भाजपला जिंकता आली. दरम्यान, रविवारी माजलगाव आणि पाटोदा बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर मतमोजणी झाली. यात माजलगाव बाजार समितीमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित आघाडीनं 18 पैकी 12 बारा जागा जिंकल्या.

व्यापारी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा यांच्या पॅनलच्या उमेदवाराच्या विरोधात माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील यांनी प्रभाकर होके, जुगलकिशोर नावंदर हे दोन उमेदवार दिले होते.

Prakash Solanke
Atpadi Bazar Samiti Result : आटपाडीत फिफ्टी-फिफ्टी; सत्ता कुणाची येणार ?

या व्यापारी मतदारसंघामध्ये हे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून होके पाटील यांच्या गटाचे या व्यापारी मतदारसंघावर एकतर्फी विजय मिळवत वर्चस्व राखले आहे. या निवडणूकीच्या माध्यमातून आमदार प्रकाश सोळंके यांचे पुत्र वीरेंद्र सोळंके देखील राजकारणात सक्रिय झाले. सेवा संस्था मतदारसंघातून त्यांनी विजय मिळविला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com