Prakash Solanke : आमदार सोळंकेंनी मंत्री मुंडेंबाबत नेमकी कोणती बाब सांगितली; अजितदादा निर्णय घेणार?

Prakash Solanke Ajit Pawar Shirdi Navsankalp camp NCP party Minister Dhananjay Munde Santosh Deshmukh murder Beed : शिर्डीतील नवसंकल्प शिबिरात बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाबाबत मोठं विधान केलं.
Prakash Solanke 1
Prakash Solanke 1Sarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : 'मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळेच बीडची ही परिस्थिती झाली आहे. हीच बाब आम्ही अजित पवार यांना सांगितली आहे. आताही नैतिकतेच्या मुद्द्यावरून मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर करावे', असा आग्रह बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी शिर्डीतील नवसंकल्प शिबिरात धरल्याचं समोर आलं आहे.

बीडमधील पक्षाच्या आमदारानं मंत्री मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं बीडचं पालकमंत्री स्वीकारलेल्या अजित पवार यांचीच अधिक कोंडी झाली आहे.

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत बीडचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्याविरुद्ध हत्येच्या कटात अटकेत आहेत. वाल्मिक कराडविरुद्ध 'मकोका' देखील लावण्यात आला आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधामुळे हे प्रकरण मोठ्याप्रमाणात राज्यात गाजत आहे. याचा फटका थेट पक्षाला बसत असल्याचा आरोप, बीडचे आमदार प्रकाश सोळंके यांचा आहे.

Prakash Solanke 1
Top Ten News : महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव ; ''...तर 1999 मध्येच काँग्रेसला पूर्णविराम मिळाला असता'' - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

आमदार प्रकाश सोळंके शिर्डीतील (Shirdi) नवसंकल्प शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरात त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद दिले नाही, हे बरे झाले, असे म्हटले. बीडचे पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वीकारल्याचा आनंद आहे. आता पक्ष नेतृत्वाने मुंडे यांच्या मंत्रीपदाचा देखील विचार करावा, अशी देखील प्रकाश सोळंके यांनी मागणी केली आहे.

Prakash Solanke 1
Praful Patel on Congress : '...तर 1999 मध्येच काँग्रेसला पूर्णविराम मिळाला असता' ; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला 'त्या' खास ऑफरचा किस्सा!

आमदार सोळंके यांनी बीडमधली सामाजिक आणि राजकीय खदखद देखील मांडली. अवैध धंद्यांना चालना, खंडणीचे प्रकार, वाळू उपसा, राखेचा उपसा, अमाप संपत्ती हे सगळे पाहून कुणाचेही डोळे फिरतील. पूर्वीच्या सरकारमध्ये मुंडे यांना पालकमंत्रीपद दिल्यानेच हे सगळे प्रकार झाले. हीच बाब आम्ही अजित पवार यांना सांगितली आहे. त्याच काळत बीड जिल्ह्याची अतिशय वाईट अवस्था झाली हे देखील तितकेच खरे आहे. आताही नैतिकतेच्या मुद्द्यावरून मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर करावे, असा आग्रह आमदार सोळंके यांनी धरला.

मंत्री मुंडेंमुळेच वाल्मिक कराड मोठा झाला आहे. त्याची अमाप संपत्तीबाबत पोलिस तपास वेगवेगळे खुलासे होत आहेत. मंत्री मुंडे आरोप सिद्ध करण्याचे आव्हान देत आहे. पण वाल्मिक कराड याला कुणी पोसला? तो कोणाचा माणूस आहे? असा सवाल केला. मंत्री मुंडे यांच्यामुळेच तो मोठा झाला. आम्हाला हे सगळे दिसते पण आमच्या पक्षनेतृत्वाला हे दिसत नाही, अशी खंतही आमदार सोळंके यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com