MLA Rajesh Tope-Lonikar Clashed: जालन्यात राडा, गाडी फोडल्यानंतर टोपे समर्थकांकडून लोणीकरांच्या घरावर दगडफेक...

BJP-NCP News : लोणीकर समर्थक संचालकाला संधी देण्याऐवजी दानवेंच्या बाजूने टोपे उभे राहिले.
MLA Rajesh Tope-Lonikar Crisis
MLA Rajesh Tope-Lonikar CrisisSarkarnama
Published on
Updated on

Jalna Political News : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या वादातून शहरात आज जोरदार राडा झाला. टोपेंवर राग धरून भाजप आमदार बबनराव लोणीकर समर्थकांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला केला होता. (MLA Rajesh Tope-Lonikar Crisis) जिल्हा बॅंकेच्या सभागृहात संचालकांची बैठक सुरू असताना खाली उभी असलेली गाडी लोणीकर समर्थकांनीच फोडली असा थेट आरोप टोपे यांनी माध्यमांशी बोलताना केला होता.

MLA Rajesh Tope-Lonikar Crisis
Marathwada Sahitya Sammelan : अजित पवारांचा दौरा रद्द, आमदार सोळंकेंना उद्घाटनाची संधी...

त्यामुळे संतापलेल्या टोपे समर्थकांनी आमदार लोणीकर यांच्या जालना शहरातील घरावर दगडफेक केल्याचा आरोप केला जातोय. (Babanrao Lonikar) लोणीकर यांच्या भावाच्या घरावरही दगडफेक झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, जिल्हा बॅंकेत सर्वपक्षीय नेत्यांच्या तडजोडीतून बहुतांश संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. (Rajesh Tope) अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीची बोलणीही ठरल्यानुसार झाली आणि अनुक्रमे सतीश टोपे आणि दानवे समर्थक भीमराव जावळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

लोणीकर समर्थक संचालकाला संधी देण्याऐवजी दानवेंच्या बाजूने टोपे उभे राहिले, या रागातून त्यांची गाडी फोडण्यात आल्याचे बोलले जाते. टोपे यांनीही तशी शक्यता जाहीरपणे वर्तवली होती. (BJP) या घटनेचे पडसाद सायंकाळी लोणीकर यांच्या घरावरील दगडफेकीतून उमटले. (Jalna) राजेश टोपे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या समर्थकांमध्ये शनिवारी (ता.दोन) सायंकाळी माऊलीनगर येथील लोणीकर यांच्या निवासस्थान परिसरात तुफान दगडफेक झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वातावरण तापले होते. जिल्हा बॅंकेच्या 17 पैकी 15 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर आज बॅंकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनची निवडणुकी बिनविरोध करण्यात आली. मात्र, व्हाईस चेअरमनपद भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या समर्थकांना न मिळता रावसाहेब दानवे यांच्या समर्थकाला देण्यात आले, यातून हा राडा झाला.

या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शहरातील माऊली नगर परिसरात जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश टोपे यांचे आणि भाजप आमदार लोणीकर यांचे निवासस्थान आहे. या ठिकणी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या व्हाईस चेअमरन पदावरून सुरू झाल्या या राजकीय धुमश्चक्रीमुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या कारवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दिलीप मोरे, सिद्धार्थ सोळंके आणि कैलास शेळके यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com