BJP MLA Ramesh Karad News
BJP MLA Ramesh Karad NewsSarkarnama

MLA Ramesh Karad News : आमदार रमेश कराडांचा भारीच काॅन्फिडन्स, स्वतःची उमेदवारी केली जाहीर

MLA Ramesh Karad was in a hurry and announced his candidacy from Latur Rural : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावध झालेल्या भाजपने विधानसभेला ताकही फुंकून पिण्याचे धोरण स्वीकारले आहे. अशावेळी एखाद्या इच्छुकाने परस्पर स्वतःची उमेदवारी जाहीर करणे भाजपच्या शिस्तीत बसते का ?
Published on

सुधाकर दहिफळे

Latur BJP Assembly Election 2024 : भाजप पार्टी विथ डिफरन्स, शिस्तीचा पक्ष असं राज्यातील नेते नेहमी सांगत असतात. एखाद्या निवडणुकीत उमेदवारी द्यायची असले तर त्याची विशेष पद्धत भाजपमध्ये आहे. असे असताना लातूरमधील विधान परिषदेचे भाजप आमदार रमेशअप्पा कराड यांनी उमेदवारी यादी जाहीर होण्याआधीच लातूर ग्रामीमधून स्वतःची उमेदवारी जाहीर करून टाकली. माझी उमेदवारी फायनल झाली आहे, तुम्ही कामाला लागा, असे आवाहनच कराड यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

लातूर (Latur) ग्रामीण विधानसभा मतदार संघात महायुतीतील घटक पक्षातील काहीजण उमेदवारी बाबत सुपारी घेऊन जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र या मतदार संघात भारतीय जनता पक्ष ताकतीने निवडणूक लढणार आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशान्वये मीच भाजपाचा उमेदवार असून माझी उमेदवारी फायनल झाली आहे. या मतदारसंघात इतिहास घडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासून मतदान होईपर्यंत जिद्दीने, उमेदीने आणि जोमाने कामाला लागावे, असे आवाहन करत आमदार कराड यांनी भाजपमधील इतर इच्छुकांना धक्का दिला आहे.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील रेणापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथप्रमुख यांची बैठक भाजपाच्या संवाद कार्यालयात झाली. छत्तीसगड येथील नंदकिशोर राणा यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात आमदार कराड यांनी केलेल्या विविध विकास कामाचा आढावा घेणाऱ्या `लातूर ग्रामीण मतदार संघ माझे कुटुंब` ही कार्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

BJP MLA Ramesh Karad News
Latur District Assembly Election 2024 : लातूरमध्ये काँग्रेसची चलती, तर भाजपची वाटचाल खडतर

लातूर ग्रामीण मतदारसंघातील उमेदवारी कायम वादात राहिलेली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्यासाठी सेटलमेंट करण्यात आल्याचा आरोप भाजपचे (BJP) माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणमध्ये भाजपचा उमेदवार कोण? असेल याची उत्सूकता लातूरकरांना असते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावध झालेल्या भाजपने विधानसभेला ताकही फुंकून पिण्याचे धोरण स्वीकारले आहे.

अशावेळी एखाद्या इच्छुकाने परस्पर स्वतःची उमेदवारी जाहीर करणे भाजपच्या शिस्तीत बसते का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेली अनेक वर्ष गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या आणि शेतकरी शेतमजुराच्या न्याय हक्कासाठी आपण सातत्याने संघर्ष केला. सत्ता असो अथवा नसो माझे कार्यकर्ते कधीच डगमगले नाहीत. याच कार्यकर्त्यांच्या जोरावर आजपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळविले. पक्षश्रेष्ठींनी माझ्या कार्याची दखल घेऊन विधान परिषदेचे आमदार केले.

BJP MLA Ramesh Karad News
BJP News: ठरलं! भाजपचे उमेदवार एक ऑक्टोबरला ठरणार; 'या' प्रक्रियेतून होणार निवड

कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आणण्यात यश आले, असा दावा कराड यांनी यावेळी केला. येणारी विधानसभा निवडणुक ही कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम देवेंद्र फडणवीस आणि भाजपनेच केले, असा दावाही कराड यांनी केला. कराड यांनी मीच फायनल, असे `डंके की चोट पे`, सांगितले. आता भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर होईपर्यंत कराड यांचा आत्मविश्वास कायम राहतो का? लातूर ग्रामीणची उमेदवारी त्यांनाच मिळते का? याकडे त्यांच्या समर्थकांचे आणि विरोधकांचेही लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com