Maratha Reservation News : नेत्यांच्या चमकोगिरीविरोधात मराठा समाज आक्रमक ; राणा पाटील, सावंत यांचे पोस्टर फाडले..

Maharashtra News : एकीकडे जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी अन् दुसरीकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींबद्दलचा राग यातून आंदोलनाचा भडका.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : वर्षानुवर्षे सत्ता, आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद भोगले, पण उपेक्षित समाजाकडे कधी लक्ष दिले नाही. आजही राज्यात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला आरक्षणासाठी झगडावे लागत आहे.

याबद्दल समाजाच्या मनात संतापाचे वातावरण असून मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने तो समोर येत आहे. (Maratha Reservation News) धाराशिवमध्ये मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्च दरम्यान, रस्त्यावर लागलेले भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे पोस्टर आंदोलकांनी फाडून टाकले.

Maratha Reservation News
Harshvardhan Jadhav News : आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव ट्रोल झाल्यानंतर गप्प..

त्याधाधी राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या पोस्टरलाही काळे फासण्यात आले. राजकीय नेत्यांबद्दलचा हा संताप दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्यावर बहिष्कार, काळे झेंडे दाखवणे, गाव, तालुका, जिल्हा आणि राज्यबंदीच्या घोषणेची काटेकोर अंमलबजावणी सध्या होतांना दिसते आहे.

(Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांच्या बेमुदत उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.

जरांगे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. एकीकडे जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी अन् दुसरीकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींबद्दलचा राग यातून आंदोलनाचा भडका उडू लागला आहे. (Ranajagjeetsingh Patil) ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना मराठ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

जिथे राजकारणी कार्यक्रमासाठी जात आहेत, तिथे मराठा आंदोलक धडक देऊन त्यांना पिटाळून लावत आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्या, या मागणीनेही लोकप्रतिनिधी हैराण झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथे शिवसेना शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना असाच मराठा आंदोलकांनी जाब विचारला, समाजासाठी राजीनामा देणार का? असा सवाल केला आणि हेमंत पाटील यांनी स्वतःच्या लेटरपॅडवर खासदारकीचा राजीनामा लिहून तो लोकसभा अध्यक्षांकडे पाठवला.

तिकडे ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनीही मराठा आरक्षणावरून समाजामध्ये संताप आहे, त्याचे लोण ग्रामीण भागात पोहचत आहे, तेव्हा सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवून आरक्षणावर निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजीनामा सत्र सुरू आहे. सत्ताधारी भाजपच्या मराठवाड्यातील आमदारांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा असून लवकरात लवकर टिकणारे आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

भाजपनंतर आता काँग्रेस आणि इतर पक्षांचे आमदारही असे पाठिंब्याचे पत्र पाठवून ते समाज माध्यमांवर व्हायरल करत आहेत. पण केवळ चमकोगिरीसाठी असे प्रकार करणाऱ्या लोकप्रतिनिधींबद्दल कठोर भूमिकाही घेतांना दिसत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com