Mla Ratnakar Gutte Blame News : महाविकास आघाडीकडून सोबत येण्यासाठी माझ्यावर दबाव होता..

Parbhani :मी पैशाच्या मागे जाणार माणूस नाही, तुम्ही मला फंड उपलब्ध करून द्या अथवा देऊ नका.
Mla Ratnakar Gutte News
Mla Ratnakar Gutte NewsSarkarnama

RSP News : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असतांना मी विरोधी आमदार म्हणून माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा आरोप (Gangakhed) गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे. गंगाखेड येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हा आरोप केला.

Mla Ratnakar Gutte News
Pankaja Munde News : भगवान गडाप्रमाणेच गहिनीनाथ गड माझे श्रद्धास्थान..

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर येवून रडले होते, महाविकास आघाडीसोबतची युती तोडा आणि भाजपला साथ द्या, नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. यावरून राजकारण तापलेले असतांनाच आता (Ratnakar Gutte) रत्नाकर गुट्टे यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे.

रत्नाकर गुट्टे म्हणाले, मी विरोधकांसोबत असल्याने मला सोबत येण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीकडून माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. (Parbhani) पण मी म्हटलं की नाही मी पैशाच्या मागे जाणार माणूस नाही, तुम्ही मला फंड उपलब्ध करून द्या अथवा देऊ नका, मला काही फरक पडत नाही. (Marathwada)

माझ्या जनतेची जशी सेवा करायची आहे, तशी सेवा मी करेल पण मला तुमच्यासोबत येण्याची इच्छा नाही. जर मी त्यांच्यासोबत गेलो असतो तर काय झाले असते, पाच कोटी रुपये निधी 25 / 15 चा मिळाला असता, आमदार निधीला तर कोणी रोखू शकत नाही.

दुसरे काय दिले असते? फार तर दहा कोटी मिळाले असते, पंधरा- वीस कोटी रोडसाठी मिळाले असते. पण मला निवडून दिलेल्या जनतेशी गद्दारी करायची नव्हती, असेही गुट्टे म्हणाले. राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार असलेल्या गुट्टे यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com