Mla Santosh Danve News : सकाळी मफलर, दुपारी ब्लेझर, संध्याकाळी फाॅर्मल; दानवेंच्या लूकची चर्चा..

Matahwada : भोकरदन-जाफ्राबादचे भाजप आमदार सर्वात तरुण म्हणून ओळखले जातात.
Mla Santosh Danve News, Jalna
Mla Santosh Danve News, JalnaSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : राजकारण्यांमधील फॅशन हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. अनेक नेत्यांचे पेहराव हे त्यांची ओळख बूनन राहिलेली आहे. जसं की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नेहमी पांढऱ्या कपड्यात असता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कायम पांढरा शर्ट, पांढरी पॅंन्ट परिधान करतात. या दोन्ही नेत्यांना क्वचितच सूट, ब्लेझर किंवा इतर रंगाच्या कंपड्यांमध्ये पाहिले असेल.

Mla Santosh Danve News, Jalna
Fauziya Khan : महागाई, बेरोजगारीवर बोललं, की ईडी, सीबीआयची धमकी देवून तोंड बंद केली जातात..

पण राजकारणात आलेल्या तरूण आमदारांमध्ये फॅशनची मोठी क्रेझ दिसून आली आहे. धीरज देशमुख, अमित देशमुख, रोहित पवार, संतोष दानवे (Santosh Danve) अशी कितीतरी नावे आहेत, जी आपल्या राहणीमानावर विशेष लक्ष देतात. हे सगंळ सांगण्याचे कारण म्हणजे (Bjp)भाजपचे तरुण आमदार संतोष दानवे यांनी एकाच दिवसात मफल, ब्लेझर आणि फाॅर्मल कपडे परिधान करत कार्यक्रमांना लावलेली हजेरी.

भोकरदन-जाफ्राबादचे भाजप आमदार सर्वात तरुण म्हणून ओळखले जातात. राजकारणामध्ये खादी आणि कडक कपड्यांची क्रेज असली तरी संतोष दानवे हे क्वचितच त्याचा वापर करतात. फाॅर्मल पण कलरफूल कपडे त्यांना अधिक आवडतात. सार्वजनिक कार्यक्रमात याच पेहरावाला त्यांची पसंती असते. पण २६ जानेवारी रोजी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावतांना पेहरावत केलेला बदल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी झेंडावंदन व मतदार संघात अनेक ठिकाणी आमदार दानवे यांच्या हस्ते उद्घाटनाचे कार्यक्रम पार पडले. यावेळी सकाळी झेंडावंदनाला हजेरी लावतांना ब्लेझर आणि त्यावर मफलर असा त्यांचा पेहराव होता. कधीही मफलर न वापरणाऱ्या दानवेंच्या गळ्यात ती पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर अकरा वाजता भैरवनाथ महाराज संस्थान कोळेगाव आणि गजानन महाराज संस्थान गोद्री यांच्या वतीने आयोजित शंकर पटाचा शुभारंभ दानवे यांच्या हस्ते करण्यात आला.

तेव्हा ते ब्लेझर घालून बैलगाडीवर चढलेले दिसते. हा कार्यक्रम आटोपून संध्याकाळी खंडोबा महाराज संस्थान भंडारगड येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भंडाऱ्याच्या कार्यक्रमात दानवे साध्या फॉर्मल ड्रेसमध्ये हजेरी लावली होती. राजकारणात मफलचे अनेक किस्से आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची ओळखच मफलरमुळे आहे. त्यांच्याकडे मफलरचे मोठे कलेकश्न असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या याच मफलरवरून त्यांच्यावर विरोधक कधीकधी टीकाही करतात. तर अशीही मफलर संतोष दानवे यांनी का घातली असले? याबद्दल देखील अनेकांना उत्सूकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com