MLA Suresh Dhas News : मी विरोधकांना जुमानत नाही, मस्साजोग अन् धनंजय देशमुख यांचा माझ्यावर विश्वास!

MLA Suresh Dhas expresses confidence in the support from the people of Massajog and Dhananjay Deshmukh, emphasizing their trust in him. : मी या हत्या प्रकरणात आरोपींना फासावर लटकवण्यासाठी सुरुवातीपासून लढा लढतो आहे. जे माझ्यावर संशय व्यक्त करतात ते राजकारणातील माझे कायमचे विरोधक राहिलेले लोक आहेत.
Suresh Dhas-Dhananjay Munde News
Suresh Dhas-Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मंत्री धनंजय मुंडे यांची एकदा नव्हे तर दोनदा भेट घेतल्यामुळे वादात सापडलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी रोखठोक भूमिका घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यावरून माझ्यावर टीका करणारे लोक हे माझे राजकारणातील कायम विरोधक असलेले आहेत. मी त्यांना जुमानत नाही.

मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात माझ्यावर विश्वास असल्याचे सांगितले आहे. (Beed News) धनंजय देशमुख यांचाही माझ्यावर विश्वास असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत यातील आरोपी आणि त्यांच्या 'आका'च्या विरोधात गेल्या अडीच महिन्यापासून सुरेश धस हे रस्त्यावरची लढाई लढत आहेत.

मात्र नुकतीच त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी आणि त्यानंतर डोळ्यांचे आॅपेरशन झाल्याचे कारण देत मंत्री धनंजय मुंडे यांची दोनदा भेट घेतली. ही भेट गुप्त असताना ती जाहीरपणे माध्यमांसमोर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघड केली. यानंतर सुरेश धस (Suresh Dahs) यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जाऊ लागला. विरोधकांनी धस-मुंडे यांच्यात सेटलमेंट झाल्याचे आरोप केले.

Suresh Dhas-Dhananjay Munde News
Sanjay Raut On Suresh Dhas : सुरेश धस भाजपा परंपरेस जागले; बावनकुळेंच्या घरी नक्की काय डील झाले ?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही हा आधुनिक काळातील फितूर असल्याची टीका धस यांच्यावर केली. तिकडे मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांकडूनही धस-मुंडे भेटीवर चिंता व्यक्त केली गेली. धनंजय देशमुख यांनी माझ्या भावाच्या खूनातील एकही आरोपी सुटला नाही पाहिजे, जर एकही आरोप सुटला तर मग संशयाला जागा निर्माण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

Suresh Dhas-Dhananjay Munde News
Sanjay Raut News : 'तेव्हा शिंदेच मुख्यमंत्री होणार होते पण पवारांनी होऊ दिलं नाही, राऊतांचा दावा

या सगळ्या वातावरणात सुरेश धस यांनी मात्र मस्साजोग येथील ग्रामस्थ आणि सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांचा या लढ्यात आपल्यावरील विश्वास कायम असल्याचा दावा केला. मी या हत्या प्रकरणात आरोपींना फासावर लटकवण्यासाठी सुरुवातीपासून लढा लढतो आहे.

Suresh Dhas-Dhananjay Munde News
Dhananjay Deshmukh : धस-मुंडे ‘पॅचअप’साठी प्रयत्न करणाऱ्या बावनकुळेंचा खेद वाटतो, त्यांना दुसऱ्याच भेटीत जादा इंटरेस्ट : धनंजय देशमुखांनी बोलून दाखवली सल

जे माझ्यावर संशय व्यक्त करतात ते राजकारणातील माझे कायमचे विरोधक राहिलेले लोक आहेत. मस्साजोगमधील लोकांचा अजूनही माझ्यावर विश्वास कायम आहे. धनंजय देशमुख यांनाही तुम्ही विचारा, त्यांनी नाही म्हटलं तर मग मला बोला, असे आवाहन देखील सुरेश धस यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com