MNS : मुंबई, ठाण्यानंतर राज ठाकरेंची तोफ आता औरंगाबादेत धडाडणार..

हिंदुत्वाच्या मुद्यावर कायम शिवसेनेसोबत राहिलेला मतदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न या निमित्ताने राज ठाकरे करणार आहेत. ( Raj Thackeray)
MNS Chief Raj Thackeray
MNS Chief Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : हिंदुत्व आणि मशिदीवरील भोंग्यावरून आक्रमक झालेले, सरकारला अल्टीमेटम देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची १ मे रोजी औरंगाबादेत सभा होणार आहे. (Aurnagabd) गुडीपाडव्याच्या शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर, तितक्याच आवाजात हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. या इशाऱ्याची अमंबजावणी देखील मनसेने (MNS) सुरू केली होती.

काल राज्यभरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने मंदिरामंध्ये हनुमान चालिसांचे पठण आणि पुस्तकांचे वाटप मनसेच्या वतीने करण्यात आले होते. स्वःत राज ठाकरे यांनी पुण्यात महाआरती करत हनुमान चालीसा म्हटली. गुडीपाडव्याच्या सभेनंतर राज्यभरातील वातावरण तापले होते, राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या इशाऱ्यावरून त्यांच्यावर टीका देखील झाले. यावर राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा घेत अधिक आक्रमक भूमिका घेतली.

३ मे रोजीपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवण्याचा अल्टीमेटम देखील राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला होता. एकंदरित राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मशिदीवरील भोंग्याचा विषय अतिशय गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी आपला मोर्चा आता औरंगाबाद सारख्या संवेदनशील शहराकडे वळवला आहे.

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा हा जिल्हा, या जिल्ह्याने, शहराने कायमच शिवसेनेला साथ दिलेली आहे. महापालिका, जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थ्यांमध्ये देखील शिवसेनेला कायम यश मिळत आले आहे. परंतु आता शिवसेनेची धार बोथट झाली आहे, महाविकास आघाडी सोबत सत्तेत गेलेल्या शिवसेनेला प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतांना अडचण होत आहे, हे लक्षात आल्यानेतर राज ठाकरे यांनी आपला मोर्चा औरंगाबादकडे वळवला आहे.

MNS Chief Raj Thackeray
जर त्यांना समजलं नाही तर तयारीत रहा! राज ठाकरेंनी दिला गंभीर इशारा

हिंदुत्वाच्या मुद्यावर कायम शिवसेनेसोबत राहिलेला मतदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न या निमित्ताने राज ठाकरे करणार आहेत. मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेला महाराष्ट्रात सर्वाधिक यश हे याच औरंगाबादमध्ये मिळाले होते. राज ठाकरे हे देखील त्याच पद्धतीने आपली वाटचाल करतांना दिसत आहेत. रमजानचा महिना असतांनाच राज ठाकरे यांनी भोंग्याचा विषय हाती घेतल्याने वातावरण तापले आहे.

अशातच औरंगाबादेत सभा घेत राज ठाकरे आणखी एक हतोडा मारण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेत व नंतर मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे यांच्या औरंगाबादेत अनेक रेकाॅर्डब्रेक सभा झालेल्या आहेत. अगदी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर राज यांनी आपले काका दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या गर्दीचे रेकाॅर्ड देखील मोडले आहेत. आता १ मे रोजीच्या राज ठाकरे यांच्या सभेली किती गर्दी होणार आणि या सभेत ते काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com