MNS News: मनसेची `स्वप्नपुर्ती`, पोलिसांनी रोखली, मोर्चामुळे तणाव अन् धरपकड..

Marathwada : पोलिस मोर्चा पुढे जावू देत नाही म्हटल्यावर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
MNS Rally For Support Chhatrapati Sambhajinagar News.
MNS Rally For Support Chhatrapati Sambhajinagar News.Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसेचे (MNS) शकडो पदाधिकारी स्वप्नपुर्ती मोर्चासाठी शहरातील संस्थान गणपती मंदिरासमोर जमले होते. हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार होता. परंतु पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना शहागंजमध्येच रोखून धरले. यावेळी आक्रमक झालेल्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

MNS Rally For Support Chhatrapati Sambhajinagar News.
Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी मोदी-शहांकडे वजन वापरा...

दरम्यान, औरंगजेबाचा उदोउदो करणाऱ्या एमआयएम (Aimim) व त्यांच्या खासदाराला मोकळीक आणि छत्रपती संभाजीनगर झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यास मज्जाव हा पोलिसांचा दुटप्पीपणा आहे. (Aurangabad) मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी आम्ही आठवडाभरापुर्वी अर्ज केला होता तरी ती नाकारण्यात आली. राज्य शासनाने घेतलेल्या एखाद्या निर्णयाचा आनंद पोलिसच आम्हाला साजरा करू देत नाहीत, अशी टीका मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.

मनसेच्या वतीने मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास मनसेचे शेकडो कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे घेवून संस्थान गणपती मंदिरासमोर जमले होते. हे पदाधिकारी शहागंज मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निघाले तेव्हा बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी मनसेच्या महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.

पोलिस मोर्चा पुढे जावू देत नाही म्हटल्यावर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण काहीजण आक्रमक झाले, तेव्हा पोलिसांनी धरपकड सुरू करत कार्यकर्त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवले. महिला पोलिस कर्मचारी महिला कार्यकर्त्यांना रस्त्यातून बाजूला करत होत्या. यावेळी मनसेचे नेते, पदाधिकारी पोलिसांना आम्हाला मोर्चा काढू द्या, अशी मागणी करत होते.

तासभर शहागंज परिसरात हा प्रकार सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत कार्यकर्त्यांना पांगवले. दरम्यान, मनसेचे नेते प्रकाश महाजन, दिलीप धोत्रे यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरला विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर आधी कारवाई करा, अशी मागणी धोत्रे यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com