MNS News : `कुत्रंही मालकाशी ईमान राखतं`, सामान्यांचा `सही`तून संताप..

Chhatrapati Sambhajinagar :लोकांनी अक्षरशः रांगा लावून सही करत आपाल्या मनातील खदखद व्यक्त केली.
MNS News, Marathwada
MNS News, Marathwada Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada : आधी शिवसेनेत फूट, नंतर शिंदेसह ५० आमदार भाजपसोबत सत्तेत. वर्ष सरत नाही तोच राष्ट्रवादीत बंड, अजित पवारासंबोत ३२ आमदार सत्तेत सहभागी या दोन घटनांनी राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघाले. (MNS News) शिंदे गटाने केलेल्या बंडाचा संताप कमी होत नाही तोच अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या बंडाची त्यात भर पडली. या विरोधात मनसेने आज राज्यभरात `संतापाची एक सही`, मोहिम सुरू केली.

MNS News, Marathwada
Mp Omraje Nimbalkar News : ठाकरेंच्या खासदाराने पंतप्रधान मोदींनाही मागे टाकले...

लोकांचा या उपक्रमाला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोक आपल्या संतप्त भावना व्यक्त करत राजकीय पक्षांवर टीकेची झोड उठवत आहेत. (MNS) छत्रपती संभाजीनगरात `संतापाची एक सही`, मोहिमेला सकाळी दहावाजेपासून सुरुवात झाली.`माकडं देखील कमी उडया (Marathwda) मारतील इतक्या उड्या तुम्ही मारल्यात, `एकदा ठीक असतं पण रोज तुमचं पक्ष बदलंन आम्ही का सहन करायचं`, अशा शब्दात सर्वसामान्य नागरिक उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

२०१९ पासून ज्या पद्धतीने चारही राजकीय पक्षांनी राजकारणाचा खेळखंडोबा चालवला आहे तो अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. (Aurangabad) या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे, हा रोष व्यक्त होण्यासाठी टीव्ही सेंटर चौकात भव्य मंडप उभारून संतापाची एक सही हा उपक्रम मनसेच्या वतीने घेण्यात आला.

लोकांनी अक्षरशः रांगा लावून सही करत आपाल्या मनातील खदखद आणि नाराजी लेखणीच्या माध्यमातून व्यक्त केली. अनेकांनी शेलक्या शब्दात राजकारण्यांना सुनावले `कुत्रा पण मालकाशी वफादार असतो, अश्या दलबदलू राजकारण्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही`, `यांच्याकडून बाँड पेपरवर लिहून घ्या; म्हणजे हे सुधारतील`, अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदवल्या आहेत.

नागरिकांचा प्रतिसाद हा उपक्रम दोन दिवस राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील सहा ठिकाणी उद्या कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, आयोजक चिन्मय बक्षी, गणेश साळुंके पाटील यांच्यासह प्रशांत जोशी,राजू जावळीकर,लीला राजपूत, अशोक पवार,अभय देशपांडे,विक्की जाधव,शेख शौकत,मंदार देसाई,अभय मांजरमकर,अभिजित आधाट, अविनाश पोफळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com