मोहन भागवतांचे देवगिरी प्रातांत आगमन; औरंगाबादेत पाच दिवस मुक्काम

(Rss Head Dr. Mohan Bhagwat In Aurangabad) देवगिरी प्रातांतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा आढावा, स्वयंसेवकांच्या भेटीगाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
Rss Head Dr. Mohan Bhagwat
Rss Head Dr. Mohan BhagwatSarkarnama

हिंगोली : राष्ट्रीय स्वंयवसेक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत हे आजपासून पाच दिवसांच्या औरंगाबाद म्हणजेच देवगिरी प्रांत दौऱ्यावर आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांनी या दौऱ्याला सुरूवात केली.

समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर भागवत यांनी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची पताका संपूर्ण देशभर खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार यासोबतच भक्ती मार्गाने अध्यात्मिक, सामाजिकतेचे प्रतीक म्हणजे श्री संत नामदेव महाराज असल्याचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी येथील गुरुद्वारालाही भेट दिली.

भक्तीमार्गाला भौतिक आणि अध्यात्मिक दृष्टया महत्व आहे . महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा लाभलेली आहे . श्री संत नामदेव यांनी साध्या, सरळ भाषेमध्ये लोकांना भक्तीमार्ग सांगितला. संत नामदेवांनी पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायाची पताका फडकवली. यातून हिंदू धर्मामध्ये सामंजस्य आणि आत्मियता दिसून येते.

साध्या- साध्या पारंपारीक गोष्टींमध्ये अध्यात्म आणि सामाजिक जागृती भारत देशांमध्ये आजही दिसते. भक्ती मार्गाचे रूप वेगळे, भाषा वेगळी असली तरीही अध्यात्मिक मार्ग एकच असल्याचे डाॅ. भागवत म्हणाले. श्री संत नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये जाऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. पंजाबी लोकांनी सहज संत नामदेवांचा मार्ग स्विकारला.

संत नामदेवांच्या ६१ ओव्या गुरूग्रंथसाहेबमध्ये आहेत. यावरून धर्म जरी वेगवेगळा असला तरी अध्यात्मिक मार्ग एकच असल्याचे सांगत गुरूनानक, गुरुगोविंदसिंग यांनीही संत नामदेवांना नेहमीच आदराचे स्थान दिल्याचे भागवत यांनी सांगितले. अध्यात्मातूनच धर्माचा प्रचार आणि प्रसार होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिकाही अशीच आहे.

एक जन , एक संघ यातूनच मुलभूत साक्षात्कार होतो, असेही डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले. नर्सी येथे श्री संत नामदेव, गुरुद्वाराचे दर्शन आणि संत नामदेव यांच्या समाधी स्थळाच्या दर्शनाने आपण धन्य झालो, अशी भावना देखील भागवत यांनी व्यक्त केली. हिंगोली येथून भागवत यांचे औरंगाबादेत आगमन होणार आहे.

Rss Head Dr. Mohan Bhagwat
`मनसे` म्हणते, साहित्य संमेलन गीतात स्वा. सावरकरांचा उल्लेख का नाही?

औरंगाबादेत ते पाच दिवस मुक्कामी राहणार असून या दरम्यान, देवगिरी प्रातांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा आढावा, स्वयंसेवकांच्या भेटीगाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मोहन भागवत हे दहा वर्षांनी औरंगाबादेत येत असून पाच दिवस मुक्कामाची त्यांची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com