देवापेक्षा जास्त विश्वास शिंदे, फडणवीसांवर, मराठा समाजाला लवकरच आरक्षण..

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते कसे देतील याचा आपण विचार करायचा नाही. चुकीची मागणी करून वातावरण चिघळणार नाही, याची काळजी घ्यावी. ( Health Minister Tanaji Sawant)
Minister Tanaji Sawant-Eknath Shinde-Fadanvis News, Osmanabad
Minister Tanaji Sawant-Eknath Shinde-Fadanvis News, OsmanabadSarkarnama
Published on
Updated on

उस्मानाबाद : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. हाफकीन संदर्भात केलेले त्यांचे विधान सध्या गाजत आहे.(Osmanabad) यावर प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला तर त्यावर देखील ते संतापले. (Tanaji Sawant) आता परमेश्वरापेक्षा माझा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याचे सांगत २०२४ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यावर असलेल्या आरोग्य मंत्र्यांच्या दौऱ्यात मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी घोषणा देत आरक्षणाची मागणी केली. (Marathwada) यावेळी सावंत यांनी त्यांच्याशी संवाद साधत मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करणारा मी सुद्धा असल्याचे सांगितले. यापूर्वी राज्यात नको असलेले सरकार असल्याने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. आता जनतेच्या मनातील सरकार राज्याच्या सत्तेत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर माझा परमेश्वरापेक्षा जास्त विश्वास असून २०२४ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळेल. इतर कुणाचे आरक्षण काढून आपण मागायचे नाही, आपल्याला आरक्षण मिळाले पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते कसे देतील याचा आपण विचार करायचा नाही. चुकीची मागणी करून वातावरण चिघळणार नाही, याची काळजी घ्यावी असा सल्ला देखील सावंत यांनी यावेळी दिला.

शिंदे सरकारमध्ये तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली. त्यांच्याकडे आरोग्या सारखे महत्वाचे खाते देण्यात आले. त्यानंतर सावंत यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला. आरोग्य विभागाचा आढावा घेतांनाच विविध सरकारी रुग्णालयांना भेटी देवून तेथील सोयी-सुविधांची ते पाहणी करत आहेत.

Minister Tanaji Sawant-Eknath Shinde-Fadanvis News, Osmanabad
धक्कादायक! मनसे शहरप्रमुखाची हत्या

दरम्यान, हाफकीन या शासकीय रुग्णाययांना औषधी पुरवठा कंपनी संदर्भात त्यांनी केलेले विधान चांगलेच वादात सापडले. हाफकीन ही कुणी व्यक्ती असल्याचा समज आरोग्य मंत्र्यांचा झाला आणि त्यांचे हसे झाले. परंतु मी काही अंगठाबहाद्दर मंत्री वाटलो का? असे म्हणत त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com