Mp Imtiaz Jaleel On`INDIA` : आमची मतं पाहिजे, पण नेतृत्व नको ; म्हणून दूर ठेवले !

Aurangabad Political : एमआयएमचा सर्वाधिक फटका देशपातळीवर जर कोणत्या पक्षाला बसला असेल तर तो काॅंग्रेसला.
MP Imtiaz Jaleel News
MP Imtiaz Jaleel NewsSarkarnama

AIMIM Political News : मुंबईत नुकतीच भाजपविरोधी देशपातळीवरील आघाडीच्या `इंडिया`, ची बैठक मुंबईत पार पडली. देशभरातील ३६ पक्षांची ही मोट बांधण्यात सध्या तरी विरोधकांना यश आले आहे. (INDIA Front News) देशभरात इंडियाची चर्चा आणि त्यावर सत्ताधारी भाजपकडून येणाऱ्या प्रतिक्रिया यातून मोदी-शहा यांनी याची दखल गांभीर्याने घेतल्याचे देखील स्पष्ट झाले. परंतु अजूनही भाजपविरोधातील काही पक्षांना इंडियाच्या या बोटीत जागा देण्यात आलेली नाही. त्यात प्रामुख्याने एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची नावे समोर येतात.

MP Imtiaz Jaleel News
Mp Imtiaz Jaleel On Maratha Reservation : मराठ्यांच्या संघर्षाला आमचा पाठिंबा, एमआयएमने घेतली भूमिका..

विशेष म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्रित लढले होते. (Maharashtra) महाराष्ट्रात एमआयएम-वंचितच्या युतीने लक्षवेधी मत मिळवली होती. (AIMIM) पण नऊ महिन्यातच ही युती तुटली आणि विधानसभा निवडणुकीत ते एकमेकांच्याविरोधात लढले. एमआयएमवर सातत्याने भाजपची बी टीम असा आरोप केला जातो. कदाचित यामुळेच एमआयएमला इंडियाचा भाग करुन घेण्यात आले नसावे, असे बोलले जाते.

परंतु इंडिया आघाडीतील पक्षांना आमची मते हवी आहेत, पण आमचे नेतृत्व नको, असे म्हणत एमआयएमचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी टीका केली. या संदर्भात इम्तियाज (Imtiaz Jaleel) यांनी एक ट्विट करत इंडियाला खडेबोल सुनावले आहे. `इनसे ताकतवर तो हम हैं. हम दो सांसद हैं. लेकिन फिर भी हमसे परहेज़ ? आखिर क्यों ? इसलिए कि उन्हें हमारे समाज का वोट चाहिए हमारा नेतृत्व नहीं ! असा आरोप इम्तियाज यांनी ट्विटमध्ये केला आहे.

एमआयएमची इंडियाचा भाग होण्याची तीव्र इच्छा होती. भाजपविरोधी आघाडीचा प्रयोग सुरू होता, तेव्हापासून ओवेसी आणि इम्तियाज जलील यांनी आम्हाला का बोलावले नाही ? त्यांनी फोन करायला हवा होता, असा सूर लावला होता. एमआयएममुळे भाजपचा फायदा होतो, असा आरोप काॅंग्रेसह इतर पक्षांनी वारंवार केला आहे. बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे स्पष्ट देखील झाले होते. एमआयएमचा सर्वाधिक फटका देशपातळीवर जर कोणत्या पक्षाला बसला असेल तर तो काॅंग्रेसला. त्यामुळेच इंडियात एमआयएम नको, अशी भूमिका काॅंग्रेसने घेतली.

इकडे महाराष्ट्रातही राष्ट्रवादीला एमआयएममुळे मुस्लिम मतांना मुकावे लागले. त्यामुळे त्यांनीही काॅंग्रेसच्या विरोधाला बळ दिले. गेली कित्येक वर्ष देशात आणि राज्यात काॅंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत असलेला मुस्लिम मतदार गेल्या काही वर्षात एमआयएममुळे दुरावला गेला. याचा राग देखील या दोन्ही पक्षांनी इंडियात एमआयएमला नो एन्ट्रीचा बोर्ड दाखवत काढला असावा. `वोट कटवा`, चा ठपका असलेल्या एमआयएमला मात्र याची सल बोचत आहे. इम्तियाज जलील यांनी असदोद्दीन ओवेसी यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत` इंडिया` आघाडीला आपल्या ताकदीची आठवण करून दिली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com