Aurangabad Political News : छत्रपती संभाजीनगर शहरातील आदर्श पतसंस्थेतील हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधींच्या ठेवी घोटाळ्यामुळे अडचणीत आल्या आहेत. (Adarsh Scam News) आयुष्यभराची कष्टाची कमाई बुडाल्याच्या एका ठेवीदाराने आत्महत्या केली, तर एकाचा ह्दयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अंबादास मानकापेसह अनेक संचालकांना पोलिसांनी अटकही केली आहे. परंतु अद्याप ठेवीदारांना पैसे परत मिळण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली दिसत नाहीत.
इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी या प्रकरणात ठेवीदारांच्या बाजूने उभे राहात आंदोलन छेडले आहे. पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढल्यानंतर आता येत्या सोमवारी, २८ रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. (AIMIM) झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी थाळी नाद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्याची शपथ मी घेतली असल्याचे सांगत इम्तियाज यांनी या आंदोलनाला अधिक धार देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मध्यंतरी या प्रकरणात राजकारण देखील रंगले होते. इम्तियाज यांनी भाजपसह सर्वच सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार, मंत्री, नेत्यांवर तोफ डागली होती. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मात्र आपण लक्ष घातल्यामुळेच घोटाळ्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केल्याचा दावा केला होता. (Scams) इम्तियाज जलील हे राजकारण करत असल्याचा आरोप देखील कराड यांनी केला होता.
दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी ठेवीदारांना दिलासा मिळावा असा निर्णय अद्यापही झालेला नाही. आदर्श पतसंस्थेवर प्रशासक नेमण्याची कारवाई करण्यात आली असली तरी ठेवीदारांना मात्र अद्याप एक छदमाही मिळालेला नाही. प्रशासकीय कारवाईला गती यावी, ठेवीदारांना त्यांच्या कष्टाचे पैसे लवकरात लवकर मिळावे, हा आपला हेतू आहे, तशी शपथच मी घेतली असल्याचे सांगत झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठीच थाळी नाद आंदोलन असल्याचे इम्तियाज यांनी म्हटले आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.