Santosh Deshmukh Case: माझं लेकरु मी कुठं शोधू? सुप्रियाताईंशी बोलताना संतोष देशमुखांच्या आईंला अश्रू अनावर

Supriya Sule On Santosh Deshmukh Case:आम्हाला तातडीने न्याय द्या, अशी मागणी देशमुखांची आईनं केली. माझं लेकरु मी कुठं शोधू, असे सांगत त्यांना अश्रू अनावर झाले. माझा राम गेला आत लक्ष्मण कुठवर धावणार, असे त्या म्हणाल्या.
Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Beed News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्याचा शोध घेण्यास पोलिसांना अद्याप अपयश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. सुळे यांनी देशमुख हत्या प्रकरणाचा तपासाचा आढावा घेतला.

आजच्या जमान्यात माणूस सापडत नाही, हे कसे शक्य, यावर आमचा विश्वास नाही. आमचं फोन टॅपिंग होत होते, आरोपी का सापडत नाही, असा सवाल सुप्रिया सुळे यानी उपस्थित केला. यावेळी त्यांच्या समवेत खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते. त्यांनी देशमुख कुटुंबियांचे सात्वन केले. हा लढा देशमुख कुटुंबियांचा नाही, तर आपल्या सगळ्याचा आहे, असे सुळे म्हणाल्या.

Santosh Deshmukh
Ganesh Naik: भाजपच्या मंत्र्याला हायकोर्टाचा दणका; ठाकरे गटानं आणलं अडचणीत; काय आहे प्रकरण

आम्हाला तातडीने न्याय द्या, अशी मागणी देशमुखांची आईनं केली. माझं लेकरु मी कुठं शोधू, असे सांगत त्यांना अश्रू अनावर झाले. संतोष- धनंजय हे दोन्ही राम-लक्ष्मणासारखे भावंड आहेत. माझा राम गेला आत लक्ष्मण कुठवर धावणार, असे त्या म्हणाल्या. लेकराशिवाय आता कशालाच महत्व नाही, असे त्या म्हणाल्या.

संतोष देशमुख यांच्या आरोपींना फासी द्या, या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आंदोलन करीत आहे. आम्हाला न्याय द्या, नाहीतर आम्ही 25 तारखेपासून अन्नत्याग आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांनी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलताना प्रशासनाला दिला.

आवादा कंपनीतील खंडणीनंतर तपासात अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला, असा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हीने

"गावातील छोटे भांडणही पप्पा सोडवायला जायचे. त्यांच्या हत्येनंतर पोलिसांनी वेळेवर आमची तक्रार घेतली नाही," अशी खंत व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com