Manoj Jarange Patil Speech : 'माझी अंत्ययात्रा नाहीतर मराठ्यांची विजययात्रा'; मनोज जरांगे पाटलांची आर-पारची लढाई!

Manoj Jarange Patil Live : पुढील आंदोलन अधिक तीव्र असणार...
Manoj Jarange Patil Live :
Manoj Jarange Patil Live :Sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Rally : मराठा समाजाला आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अंतरवाली सराटीत आज (दि. १४) शनिवारी दुपारी सभा पार पडली. या वेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी आपला लढा अधिका बळकट झाला असून, आता आरक्षणासाठी आर-पारच्या लढाईचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे पाटील म्हणाले, "आंदोलन होऊन बरोबर एक महिना झाला. आता सरकारने दहा दिवसांत मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे. राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे की, मराठा समाजाची आणखी हालअपेष्टा करू नका, आता वाट पाहण्याची आमची तयारी नाही. आता दहा दिवसांत आऱक्षण द्या, 2२ ऑक्टोबरपर्यंत आरक्षण जाहीर करा, नाहीतर 23 पासून काय करायचं ते आम्ही दाखवून देऊ," असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला.

जरांगे म्हणाले, "एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल. आता आर-पारची लढाई असणार आहे. विदर्भातील मराठा शेतकऱ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे. मराठा समाजाचा व्यवसाय शेती आहे. समाजाची विनंती आहे, की मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्या. आमचं कष्ट करणारं लेकरू नोकरीला लागलं पाहिजे, सरकारने आरक्षणासाठी लावलेल्या अटी शर्ती मागे घ्याव्यात," असेही जरांगे म्हणाले.

जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभेला प्रचंड जनसमुदाय जमला होता. या सभेला हजारो लोकांची उपस्थिती होती. तब्बल 100 एकर शेतात ही सभा झाली. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला तातडीने आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com