Nana Patole On Protest News : सरकारविरोधी आंदोलनात गर्दी होत नाही, नाना पटोलेंनी काढले फर्मान..

Congress : पदाधिकाऱ्यांनी किमान ४०, जिल्हा पदाधिकाऱ्याने २० तर ब्लॉक स्तरावरील पदाधिकाऱ्याने १० कार्यकर्ते सोबत आणावे.
Congress President Nana Patole News
Congress President Nana Patole NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करताना कॉंग्रेसचे बोटावर मोजण्याएवढेच पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होतात. याची दखल आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी घेतली आहे. प्रदेश पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक आंदोलनात, कार्यक्रमात किमान ४०, जिल्हा पदाधिकाऱ्याने २० तर ब्लॉकस्तरावरील पदाधिकाऱ्यांनी १० कार्यकर्ते सोबत आणावेत, असे आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. जे पदाधिकारी सक्रीय नसतील त्यांची नावे जिल्हाध्यक्षांनी पाठवावीत, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

Congress President Nana Patole News
Sushama Andhare On Shirsat News : आमदार शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार..

काँग्रेसतर्फे (Congress) जनतेच्या विविध समस्या, राजकीय मुद्द्यांवर वारंवार आंदोलने, मोर्चे काढले जातात. प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हास्तरावर पक्ष पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात स्वतः सहभागी होत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सहभागी करून घेणे अपेक्षीत असते. पण अनेक पदाधिकारीच आंदोलनात, मोर्चात सहभागी होत नाहीत. (Marathwada) हा प्रकार चिंताजनक असल्याचे मत नुकत्याच झालेल्या झूम मिटींगमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, अपवादात्मक परिस्थिती वगळता पक्षाच्या सर्वच कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले पाहिजे. पक्षाने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यानुसार पालन होणे अपेक्षित आहे. पण प्रदेश, जिल्हा व ब्लॉक स्तरावरील अनेक पदाधिकारी संघटनात्मक पद घेऊनही पक्षाचे काम करत नसतील तर त्यांच्या जागी इतरांना संधी देता येईल.

पक्षाच्या कार्यक्रमात वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची माहिती प्रदेश कार्यालयाकडे तातडीने पाठविण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्षांची असेल. यापुढे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात, आंदोलनात अथवा मोर्चात प्रदेश पदाधिकाऱ्यांनी किमान ४०, जिल्हा पदाधिकाऱ्याने २० तर ब्लॉक स्तरावरील पदाधिकाऱ्याने १० कार्यकर्ते सोबत आणावे. जे पदाधिकारी आपल्या सोबत कार्यकर्ते आणणार नाही, अशा लोकांची माहिती प्रदेश कार्यालयास तातडीने देण्यात यावी, त्यांच्यावर कार्यवाही करता येईल, असेही पटोले यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com