Nanded : न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली ; अन् जागेवरच सहा महिन्यांची शिक्षा

Court News : साक्ष सुरू असतांना अचानक हंबर्डे याने सोबत आणलेली चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली.
Nanded Court News
Nanded Court NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात एक अजबच प्रकार घडला. दरोड्यातील एका आरोपीला साक्ष नोंदवण्यासाठी कोर्टात हजर केले तेव्हा त्यांनी सोबत लपवून आणलेली चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. (Nanded) पण डायसला लागून चप्पल खाली पडल्यामुळे अनर्थ टळला.

Nanded Court News
Ajit Pawar News : राज्यात एकही पक्ष स्वबळावर लढू शकत नाही..

या प्रकाराने पोलीस आणि न्यायालयात (Court) उपस्थितीत कर्मचाऱ्यांची मात्र भांबेरी उडाली. या प्रकाराबद्दल प्रथम वर्ग न्यायाधीशांनी आरोपीला जागेवर सहा महिन्यांची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. (Marathwada) न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावल्यामुळे आरोपीला घेऊन आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये मात्र घबराट पसरली होती.

प्रथमवर्ग न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्यासमोर सराईत गुन्हेगार दत्ता हंबर्डे याला सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात हंबर्डे यांच्यावर गंभीरस्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपासू हा आरोपी नांदेडच्या मध्यवर्ती कारागृहात होता. त्याला व त्याच्या अन्य साथीदारांना साक्षीसाठी आज जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते.

साक्ष सुरू असतांना अचानक हंबर्डे याने सोबत आणलेली चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. ती डायसला लागून बाजूला पडली, यामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने आरोपीला बाजूला नेले. त्यानंतर न्यायाधीशांनी जागेवर आरोपीला या प्रकाराबद्दल सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजार रुपयाचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एक महिन्याची शिक्षा करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com