Nanded BJP News : चिखलीकर लागले प्रचाराला, तर चव्हाणांचा जोर मात्र शिल्लक काँग्रेस भाजपत आणण्यावरच!

Prataprao Patil Chikhlikar and Ashok Chavan News : चिखलीकरांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने चव्हाण यांच्यावरती सोपवलेली आहे.
Ashok Chavhan
Ashok Chavhansarkarnama
Published on
Updated on

Nanded Lok Sabha Constituency News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यापासून त्यांनी काँग्रेसमधील आपल्या समर्थकांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा घालण्याचा सपाटा लावला आहे. सुरुवातीच्या काळात सुरू झालेले प्रवेश सोहळे मध्यंतरीच्या काळात थांबले होते. परंतु आता पुन्हा त्याला वेग आला असून, गेल्या दोन दिवसांत शकडो काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज संस्थांमधील सदस्यांनी चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला.

नांदेड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी प्रतापराव पाटील चिखलीकर(Prataprao Patil Chikhlikar) यांना जाहीर झाली आहे. चिखलीकरांना उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी मुंबईत अशोक चव्हाण यांची पक्ष कार्यालयात जाऊन भेटही घेतली होती. चव्हाण यांनीही त्यांना शुभेच्छा देत विजयाची गॅरंटी दिली. पण नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर मात्र या दोन्ही नेत्यांची तोंड पुन्हा विरुद्ध दिशेलाच असल्याचे दिसून आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Chavhan
Hingoli Loksabha 2024 : एकाच्या घरी नाश्ता तर दुसऱ्याच्या घरी जेवण; हिंगोली दौऱ्यात ठाकरेंनी साधला समतोल...

चिखलीकर हे एकटेच आपल्या समर्थकांसोबत प्रचाराला फिरत असल्याचे चित्र आहे. चव्हाण कुठेच त्यांच्यासोबत अद्याप तरी दिसत नाहीत. काँग्रेसमधील समर्थकांना भाजपमध्ये आणून जिल्ह्यातील आपली वैयक्तिक ताकद वाढवण्यावरच त्यांचा भर दिसतो आहे. मध्यंतरी ब्रेक लागलेल्या प्रवेश सोहळ्यांना नव्याने सुरुवात झाली असून, गेल्या दोन दिवसांत हजारो काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या सोहळ्यातून अशोक चव्हाण(Ashok Chavan) भाजपला बळ देत आहेत? की मग आपल्या राजकीय वारसदारासाठी जमीन तयार करत आहेत, अशा शंका उपस्थितीत केल्या जात आहेत.

अर्थात चिखलीकरांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने चव्हाण यांच्यावरही सोपवली असल्यामुळे येत्या काही दिवसांत ते चिखलीकरांचा प्रचार करताना दिसतील, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक बाळगून आहेत.

दरम्यान, नायगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बापूसाहेब कौडगावकर यांच्यासह उमरी तालुक्यातील युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन आदींनी नुकताच नांदेड येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नायगावचे आमदार राजेश पवार, विधान परिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर आदी या वेळी उपस्थित होते.

Ashok Chavhan
Devendra Fadanvis News : नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार ? अमरावतीच्या जागेबाबत फडणवीसांचे मोठे संकेत

तसेच देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रीतम देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती रामराव नाईक आदींसह देगलूर तालुक्यातील अनेक प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष, बंजारा समाजाचे नेते कैलास राठोड यांनीही अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले.

तर आज काँग्रेसचे ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष विजय देवडे लहानकर, नांदेड पंचायत समितीचे माजी सभापती दीपक कोसबतवार, मुदखेड पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नांदेड येथे पक्षात प्रवेश केला. या वेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजप(BJP) ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गाते, भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, नामदेवराव आयलवाड आदी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com