Nanded Bjp District president News : भाजप भाकरी फिरवणार ? की चिखलीकर सांगतील तोच जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष ...

Bjp : जुने निष्ठावंत आणि नव्याने प्रवेश केलेले असे दोन वेगवेगळे गट असल्यामुळे ज्येष्ठांची दमछाक
Nanded Bjp District president News
Nanded Bjp District president NewsSarkarnama

Marathwada : भारतीय जनता पक्षाची राज्याची जंबो कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नांदेड जिल्ह्यातील तब्बल ३१ जणांचा समावेश केला. त्यानंतर बावनकुळे नांदेडच्या दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी ते जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षांची निवड जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. येत्या दहा दिवसात जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष यांच्या निवडी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Nanded Bjp District president News
Bjp District President News : भाजप जिल्हाध्यक्षपदी समर्थकाची वर्णी लावण्यासाठी दोन मंत्र्यांमध्ये स्पर्धा ?

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील भाजप कार्यकारिणीचा कार्यकाळ संपून सहा महिने उलटून गेले तरी जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली दिसत नव्हत्या. मात्र आता या प्रक्रियेला वेग आला आहे. (Bjp) सध्या महानगराध्यक्ष म्हणून प्रविण साले तर ग्रामिणचे जिल्हाध्यक्ष म्हणून व्यंकटराव पाटील गोजेगावकर कार्यरत आहेत.

भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्यासोबत महानगराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांचा समन्वय चांगला आहे. मात्र, काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्यात मात्र गटातटाचे राजकारण सुरू असते. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षपद सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या व्यक्तीकडे असावे, अशी मागणी जोर धरत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील पाच बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला म्हणावे तसे यश मिळाले नाही.

मराठवाड्यात प्रसिद्ध आणि मोठ्या असलेल्या नांदेडच्या बाजार समितीत तर भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला सपाटून मार खावा लागला. एकही जागा युतीला मिळाली नाही आणि दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, नांदेड शहर आणि जिल्ह्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे या ठिकाणी इतर पक्षाप्रमाणे भाजपने देखील दोन जिल्हाध्यक्ष आणि एक महानगराध्यक्ष निवडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे काही आजी माजी पदाधिकारी तसेच सदस्यांनी देखील नाराजीचा सूर आळवला आहे.

या निवडी करताना जुने निष्ठावंत आणि नव्याने प्रवेश केलेले असे दोन वेगवेगळे गट असल्यामुळे ज्येष्ठांची दमछाक होत असल्याची चर्चा आहे. ज्यांना प्रदेश कार्यकारिणी आणि निमंत्रित सदस्य म्हणून राज्यातील कार्यकारिणीत घेतले आहे त्यांची शहर किंवा जिल्हा कार्यकारिणीवरची शक्यता मावळली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उर्वरित पैकी कोणाची वर्णी महानगराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदी लागणार? याकडे लक्ष लागून आहे.

Nanded Bjp District president News
Supreme Court Final Decision : आज फैसला : ठाकरे गट-शिंदे गटाची धाकधुक वाढली..; आत्तापर्यंत काय घडलं, सविस्तर वाचा

महानगराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेत असून जुन्या सोबत नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार करताना जिल्ह्यातील भाजपचे खासदार आणि आमदार यांची मते विचारात घेतली गेली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्ष निवडताना त्यांची मते विचारात घेतली जातील.

तसेच आगामी निवडणुका आणि विविध जातीय समीकरणे लक्षात घेऊन निवडी करावी लागणार आहे. नुकतेच माजी आमदार गजानन घुगे यांनी आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून इच्छुकांची चाचपणी केली आहे. त्यामुळे आता ही पदे कुणाच्या पारड्यात जाणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com