Nanded BJP News : खासदार चिखलीकरांच्या बैठकीत आमदार राजेश पवार टार्गेट...

Marathwada Political News :आमदार पवार यांनी चार वर्षात नायगाव, उमरी, धर्माबाद तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला.
Nanded BJP News
Nanded BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

MLA Rajesh Pawar News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्वतयारीसाठी बोलावलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या बैठकीत नायगावचे भाजप आमदार राजेश पवार टार्गेट झाल्याचे दिसून आले. (Nanded BJP News) विशेष म्हणजे पवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात. पण चिखलीकरांनी बोलावलेल्या बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राज्य कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी आमदार पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.

Nanded BJP News
Nanded Loksabha Constituency News : नांदेड लोकसभा जिंकण्यासाठी भाजपची तयारी, पण कार्यकर्त्यांची नाराजी नडणार..

पवार हे काँग्रेस धार्जिणे असल्याची टीका बच्चेवार यांनी केली आणि (BJP) भाजपमधील अतंर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. `मिशन 45` साठी मैदानात उतरलेल्या भाजपला नांदेड (Nanded) लोकसभा मतदारसंघा अपशकून झाल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात होतांना दिसते आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत पाहणीमध्ये नांदेड लोकसभेची जागा डेंजर झोनमध्ये असल्याचे बोलले जाते. विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पर्याय शोधण्याचे प्रयत्नही पक्षाकडून सुरू असल्याची चर्चा आहे.

यातच पक्षांतर्गत गटबाजी अशी चव्हाट्यावर येत असल्याने भाजपच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. `पार्टी विथ डिफ्रंस` साठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये ही बेशिस्त खपवून घेतली जाणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. (MP Pratap Patil Chikhlikar) नायगाव विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश पवार हे काँग्रेस धार्जिणे धोरण राबवत असल्याचा आरोप चिखलीकर यांचे समर्थक बालाजी बच्चेवार यांनी केला आणि एकच खळबळ उडाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बोलविण्यत आलेल्या बैठकीच्या व्यासपीठावरुनच राजेश पवार यांच्यावर हे आरोप करण्यात आले. आमदार पवार यांनी चार वर्षात नायगाव, उमरी, धर्माबाद या तीन तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला. या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू असुन काही पुर्ण झाली आहेत. पवारांचे प्रगती पुस्तक चांगले असतांना चिखलीकर समर्थक मात्र त्यांना टार्गेट करत असल्याचा पवार समर्थकांचा आरोप आहे.

दुसरीकडे बालाजी बच्चेवार यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून खासदार चिखलीकरांना गेल्या निवडणुकी पेक्षा दुप्पट मताधिक्य मिळवून देण्याचा दावा केला. राजेश पवार यांच्या माघारी खासदार चिखलीकर यांच्यासमोरच त्यांच्यावर टीका केली गेली. पवार हे सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आहेत.

त्यामुळे ते परतल्यानंतर चिखलीकर समर्थकांच्या टीकेला कसे उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. मात्र यावरून नांदेड जिल्हा भाजपमध्ये बऱ्याच कुरबुरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सगळ्यावर खासदार चिखलीकर आणि राज्यातील वरिष्ठ नेते काय मार्ग काढतात आणि सगळ्यांना एकदिलाने लोकसभेच्या कामाला लावतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com