Nanded : आधी लगीन.. काॅंग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर विवाहबद्ध ..

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी विशेष अधिवेशन आजच बोलावण्यात आले होते. शिंदे-फडणवीस गटासोबतच महाविकास आघाडीसाठी देखील ही निवडणूक मोठी होती. (Congress Mla Jitesh Antapurkar)
Congress Mla Jitesh Antapurkar Got Married News
Congress Mla Jitesh Antapurkar Got Married NewsSarkarnama
Published on
Updated on

नांदेड : देगलूर-बिलोलीचे काॅंग्रेस आमदार जितेश अंतापूरकर आज प्रतिक्षा यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले. त्यांच्या शाही विवाहास जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने वधु-वरास आशिर्वाद देण्यासाठी उपस्थितीत होते. (Nanded) विशेष म्हणजे राज्यातील सत्तांतरानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी विशेष अधिवेशन आजच बोलावण्यात आले होते.

शिंदे-फडणवीस गटासोबतच महाविकास आघाडीसाठी देखील ही निवडणूक मोठी होती. त्यामुळे दोन्ही बाजूंसाठी प्रत्येक मत महत्वाचे होते. परंतु काॅंग्रेस आमदार जितेश (Jitesh Antapurkar) यांनी मात्र आधी लगीन, अशी भूमिका घेत विधानसभा अधिवेशनाला दांडी मारत लग्न उरकून घेतले. (Congress) अर्थात त्यांना पक्षश्रेष्ठींनी तशी परवानगी दिली होती.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीत महाविकास आघाडीचे राजन सावळवी विरुद्ध शिंदे-फडणवीस गटाचे राहूल नार्वेकर अशी लढत झाली. राहूल नार्वेकर हे १६४ विरुद्ध १०७ मतांनी विजयी झाले. इकडे विधानसभा अध्यक्षांनी पदभार घेतला, तर तिकडे आमदार अंतापूरकर हे प्रतिक्षा यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले.

दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर महाविकास आघाडीने त्यांचे चिरंजीव जितेश यांना उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत जितेश हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. तत्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जितेश यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या.

Congress Mla Jitesh Antapurkar Got Married News
Congress : नामांतराला विरोध केला नाही, पक्षश्रेष्ठी थोरातांवर नाराज ; खुलासा मागितला..

तर भाजपने सुभाष साबणे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली होती. परंतु सहानुभूतीची लाट आणि स्व.रावसाहेब अंतापूरकर यांनी मतदारसंघात केलेली कामे याची पावती म्हणून देगलूर-बिलोलीकरांनी जितेश यांना वडिलांपेक्षाही अधिक मताधिक्याने निवडून दिले. आमदार झाल्यानंतर वर्षभरातच जितेश विवाहबद्ध झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com