Ashok Chavan News : पंकजा मुंडे नांदेडच्या पालकमंत्री? चर्चा आहे! खासदार चव्हाण म्हणाले, तो फार मोठा विषय नाही…

Nanded Guardian Minister Pankaja Munde BJP Maharashtra Government : नांदेड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाबाबत मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आहे. यावर शिर्डी येथील अधिवेशनात खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
Pankaja Munde, Ashok Chavan
Pankaja Munde, Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : मंत्री पंकजा मुंडे या नांदेडच्या पालकमंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर नांदेडमधील नेते भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देत विषय संपवला. "तो फार मोठा विषय नाही. मराठवाड्यातील विषय आहे. काही जण बोलत असतील तर त्या लोकांच्या भावना आहेत. त्या  व्यक्त केल्या असतील", असे खासदार चव्हाण यांनी म्हटले.

भाजपचे खासदार अशोक चव्हाण शिर्डी येथे अधिवेशनाला आले होते. साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्री पंकजा मुंडे नांदेडच्या पालकमंत्री पदाच्या चर्चेत आहेत, या प्रश्नावर त्यांनी तो फार मोठा विषय नाही. एवढीच प्रतिक्रिया दिली.

Pankaja Munde, Ashok Chavan
Raosaheb Danve on Shiv Sena : ...तर हातात हात मिळवण्याची तयारी; ठाकरे सेनेबाबत रावसाहेब दानवेंच्या मनात नेमकं काय?

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. 'स्थानिक'च्या निवडणुकांना सामोरे जाताना, स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन भाजप निर्णय घेणार आहे", असे खासदार चव्हाण यांनी सांगितले. 

'या महाविजय अधिवेशनातून आम्ही नवीन ऊर्जा घेऊन जात आहोत. मोठ्या ताकतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये यश मिळवू. विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला खूप मोठा यश दिलं. त्यामुळे त्यांचे आभार मानावेच लागणार. भाजपची सभासद नोंदणीची प्रक्रिया स्थानिक पातळीवर वेगाने सुरू आहे या अधिवेशनानंतर ते अधिक वेगाने करू', असेही खासदार चव्हाण यांनी म्हटले.

Pankaja Munde, Ashok Chavan
Raosaheb Danve on Shiv Sena : ...तर हातात हात मिळवण्याची तयारी; ठाकरे सेनेबाबत रावसाहेब दानवेंच्या मनात नेमकं काय?

"महाविकास आघाडीत आता बिघाडी होताना दिसत आहे. महाविकास आघाडी विस्कळीत झालेली दिसते. आघाडीत काही नाही, एकवाक्यता नाही. दिल्लीमध्ये पहातोय काय सुरू आहे ते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून काँग्रेस एकाकी पडली आहे", असाही टोला खासदार चव्हाण यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com