Nanded News : माहुर गडावर मुंडे-पटोलेंची भेट ; शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी केली प्रार्थना..

Munde - Patole Meet : भारत जोडो यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल देखील मुंडे यांनी नानांचे अभिनंदन केले.
Patole-Munde News, Nanded
Patole-Munde News, NandedSarkarnama
Published on
Updated on

Munde-Patole News : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांची आज माहुरगडावर भेट झाली. दोघेही रेणुका देवीच्या दर्शनासाठी आले होते. Nanded राज्यातील शेतकरी व कष्टकारी सुखी होवू दे, असे साकडे दोघांनीही रेणुका मातेला घातले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वी होत असल्याबद्दल देखील धनंजय मुंडे यांनी पटोलेचे यावेळी अभिनंदन केले.

Patole-Munde News, Nanded
Beed : घरकुलाच्या जागेसाठी उपोषण केले अन् त्याने जीवच गमावला..

राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असतांना नाना पटोले (Nana Patole) आणि धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांची माहुरगडावर झालेली भेट चांगलीच चर्चेत आली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असतांना सामाजिक न्याय मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात नेहमी संवाद व्हायचा. पण राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते क्विचतच भेटतात.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आगमन झाले तेव्हापासून नाना पटोले या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील नांदेड येथे राहुल गांधींच्या जाहीर सभेत हजेरी लावत भारत जोडो यात्रेला आपला पाठिंबा दर्शवला होता.

त्यानंतर आज पटोले आणि मुंडे यांची भेट झाली. माहुरगडावर दोघांनीही रेणुकामातेला राज्यातील शेतकरी-कष्टकरी सुखी होवू दे, असे साकडे घातले. त्यानंतर मंदिर विश्वस्तांच्या कार्यालयात या दोन नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.

भारत जोडो यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल देखील मुंडे यांनी नानांचे अभिनंदन केले. या शिवाय मराठवाडा व विदर्भातील अन्य विषयांवरही यानिमित्ताने चर्चा झाल्याचे मुंडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com