Beed : घरकुलाच्या जागेसाठी उपोषण केले अन् त्याने जीवच गमावला..

Beed : अप्पाराव पवार यांच्या पत्नी कविता पवार यांना शबरी योजनेतून घरकुल मंजूर झाले.
Hunger striker Beed News
Hunger striker Beed NewsSarkarnama

Hunger striker News : अप्पाराव भुजंग पवार (वय ५५, रा. वासनवाडी ता. बीड) यांचा घरकुलाच्या जागेसाठी उपोषणादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. अप्पाराव पवार मृत्यूनंतर समाजबांधव, संघटना आक्रमक झाल्या आहेत. Beed दरम्यान, त्यांनी मागणी केलेली वासनवाडी येथील गायरान जमिन प्रशासनाला कायदेशिररित्या त्यांच्या नावे करता येत नव्हती. त्यामुळे त्यांना घरकुलासाठी प्रशासनाने पाच ठिकाणी सुचविलेल्या जागांना त्यांच्या कुटूंबियांनी नकार देत वासनवाडीच्याच जागेसाठी आग्रह धरला होता, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिली.

Hunger striker Beed News
Jalna : दोन वर्षांपुर्वी माफी मागितली होती, आता पुन्हा मागतो..

अप्पाराव पवार यांच्या पत्नी कविता पवार यांना शबरी योजनेतून घरकुल मंजूर झाले. या कुटूंबियांनी तालुक्यातील वासनवाडी येथील सर्वे क्रमांक १६६ मधील जागा द्यावी, अशी या कुटूंबियांची मागणी होती. (Beed) त्यासाठी हे कुटूंबिय दोन वर्षांपासून कायम आंदोलन करत आहे. वर्षापूर्वी आंदोलनावेळीच त्यांची मुलगी साखरबाई हीचीआंदोलस्थळी प्रसुती झाली होती. (Marathwada) तर, आता रविवारी पुन्हा या कुटूंबियांनी आंदोलन सुरु केले. दुसऱ्या दिवशी पहाटे अप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पवार कुटूंबियांकडून वासनवाडी (ता. बीड) येथील सर्व्हे क्रमांक १६६ मधील जागा कायदेशिररित्या त्यांच्या नावे हस्तांतरण करण्यास प्रशासनाला अडचण होती. गायरान जमिन व्यक्तीगत कारणासाठी हस्तांतरण करता येत नसून केवळ शासकीय प्रकल्पांसाठी हस्तांतरण करता येते असा २०११ चा शासन निर्णय आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच या कुटूंबियांना कळविले होते. तसेच, या घरकुलासाठी दगडी शहाजानपूर, सोमनाथवाडी, मुळूकवाडी, घाटसावळी, पिंपरगव्हाण या पाच ठिकाणी दाखविलेल्या जागांना या कुटूंबियांनी नकार दिल्याचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी पत्रकात म्हटले आहे.

तरीही याच जमिनीसाठी आग्रह धरुन त्यांच्याकडून वारंवार उपोषणे केली जात होती. त्यांना छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्वशिल कांबळे यांनी सुचविलेल्या दगडी शहाजानपूर, सोमनाथवाडी, मुळूकवाडी, घाटसावळी, पिंपरगव्हाण या पाच ठिकाणच्या जागा प्रशासनाने दाखविल्या. मात्र, या ठिकाणी घरकुल बांधण्यास पवार कुटूंबियांनी नकार दिला.

Hunger striker Beed News
या बिल्डरच्या मदतीने शिंदेंनी आमदारांना सुरतला नेले; खोक्यांची व्यवस्थाही : शिवसेनेच्या दाव्याने खळबळ

पारधी समाजातील व्यक्तींच्या मंजूर घरकुलांच्या बांधकामासाठी जागेचा प्रश्न निकाली काढून पुनर्वसन करण्यासाठी सामाजिक संस्थेमार्फत जागा खरेदी करुन त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांना याबाबत सुचना देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, घटनेनंतर संबंधीतांवर गुन्हे नोंद झाल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका पवार कुटूंबियांनी घेतली. विविध संघटनांनी प्रशासनावर आरोप केले. रविवारी या विषयावर जिल्हा प्रशासनाने संबंधीत विभागाची बैठक बोलविली आहे. यादरम्यान पवार कुटूंबियांसह विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली आहे.अप्पाराव पवार यांच्या उत्तरीय तपासणी विविध आजारांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com