Nanded News : एकाच घरात सहा जणांना उमेदवारी, ते पुतणीसाठी चुलतीची माघार! नांदेडच्या निवडणुकीतील रंगत!

Mukhed Municipal Council Election : काँग्रेससह एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला होता. त्यानंतर निवडणुकीत विरोधात उभ्या असलेल्या चुलतीने पुतणीसाठी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला.
Mukhed Municipal Council Election News
Mukhed Municipal Council Election NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. नांदेडच्या मुखेड नगर पालिकेत भाजपने पहिल्यांदाच खाते उघडत 21 वर्षीय स्नेहाचा बिनविरोध विजय मिळवला.

  2. स्नेहाच्या काकूने पुतणीसाठी माघार घेतल्याने तिला कोणतीही स्पर्धा न राहता थेट निवड झाली.

  3. या घटनेमुळे मुखेडच्या राजकारणात भाजपची उपस्थिती मजबूत झाल्याची चर्चा असून कुटुंबीय राजकारणावरही बरेच प्रश्न उपस्थित झाले.

Marathwada Local Body Election : मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा व्हावी अशा काही घटना घडत आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेत भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याच्या प्रकाराने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. घराणेशाहीचे सगळे विक्रम लोह्यामंध्ये मोडले गेले. विशेष म्हणजे याचे समर्थनही भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केले गेले. दुसरीकडे मुखेड नगरपालिकेत काही उमेदवारांची माघार आणि पुतणीसाठी चुलतीने एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतल्याने अवघ्या एकविसाव्या वर्षी नगरसेवक होण्याचा मान एका तरुणीला मिळाल्याचे उदाहरण समोर आले आहे.

काँग्रेससह एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला होता. त्यानंतर निवडणुकीत विरोधात उभ्या असलेल्या चुलतीने पुतणीसाठी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्नेहा संजय तमशेट्टे ही एकवीस वर्षांची तरुणी भाजपकडून बिनविरोध नगरसेवक झाली. एकीकडे राज्यात एकमेकांची जिरवण्यासाठी अनेक नात्यागोत्यातले लोक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तर दुसरीकडे चुलतीने पुतणीसाठी माघार घेत एक चांगला आदर्श ठेवल्याची चर्चा नांदेडच्या राजकारणात होताना दिसते आहे. नांदेड जिल्ह्यात या निमित्ताने भाजपचेही खाते उघडले गेले.

मुखेड नगरपरिषदेत वीस नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. स्नेहा तमशेट्टे या तरुणीने भाजपकडून प्रभाग क्रमांक 4 अ ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागेसाठी उमेदवारी दाखल केली होती. याच प्रभागामधून काँग्रेस आणि दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी एक अपक्ष महिला उमेदवार जयश्री हणमंत तमशेट्टे ह्या स्नेहाच्या काकू होत्या. अर्जाची पडताळणी प्रक्रिया झाली तेव्हा काँग्रेस व एक अपक्ष अर्ज बाद झाला होता. त्यानंतर स्नेहा आणि त्यांच्या काकू या दोघांचे अर्ज वैध ठरले होते.

Mukhed Municipal Council Election News
Nanded Municipl Corporation 2025 : नांदेड महापालिकेत पक्षांतरानंतरही अशोक चव्हाणांची जादू चालणार का? काँग्रेस त्यांना कसे रोखणार!

सुरवातीपासून या प्रभागातील निवड ही बिनविरोध होणार अशी चर्चा होती. प्रश्न होता तो फक्त माघार कोण घेणार याचा? अखेर पुतणीसाठी चुलतीने माघार घेतली आणि कुठल्याही वादाशिवाय पुतणी नगरसेवक झाली. माघार घेण्याच्या दिवशी जयश्री तमशेट्टे यांनी अर्ज मागे घेतला आणि नांदेड जिल्ह्यात भाजपने बिनविरोध नगरसेवक निवडून आणत खाते उघडले. स्नेहा हि अवघ्या एकवीस वर्षांची असून तिचे शिक्षण बी फार्मसी पर्यंत झाले आहे.

Mukhed Municipal Council Election News
BJP News : भाजपने रेकाॅर्ड मोडला, लोहा नगरपरिषदेत पदाधिकाऱ्यासह पत्नी, भाऊ, मुलगा, भावजय, मेहुण्यालाही उमेदवारी!

भाजपचे आमदार तुषार राठोड यांनी यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जाते. मुखेडमध्ये भाजप, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट अशी तिरंगी लढत आहे. नगराध्यक्ष पदासासाठी तिन्ही पक्षांनी प्रबल उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दरम्यान मुखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 60 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदाचा 1 आणि नगरसेवक पदाच्या 20 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे.

FAQs

1) स्नेहा कोणत्या पक्षाकडून निवडून आली?

स्नेहा भाजपकडून बिनविरोध निवडून आली आहे.

2) ती बिनविरोध कशी निवडून आली?

तिच्या काकूने स्वतःचा अर्ज मागे घेतल्याने स्नेहा एकमेव उमेदवार ठरली आणि ती बिनविरोध विजयी झाली.

3) स्नेहाचे वय किती आहे?

स्नेहा 21 वर्षांची आहे.

4) हा विजय विशेष का मानला जातो?

मुखेड नगर पालिकेतील या बिनविरोध निवडीने भाजपने जिल्ह्यात पहिले खाते उघडले असून इतक्या तरुण उमेदवाराचा बिनविरोध विजय चर्चेचा विषय ठरला आहे.

5) या घटनेवर स्थानिक पातळीवर काय प्रतिक्रिया आहेत?

काहींना हा विजय भाजपचे बळ वाढवणारा वाटतो, तर काहीजण कुटुंबीय राजकारणाचा मुद्दा पुढे करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com