Nanded : पाकिस्तानी बिलावलचा पुतळा जाळतांना खासदारांच्या हाताची बोटंच भाजली..

Mp.Chikhlikar : चिखलीकरांवर ताबडतोब प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांनी सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली.
Mp Prataprao Patil Chikhlikar news, Nanded
Mp Prataprao Patil Chikhlikar news, NandedSarkarnama
Published on
Updated on

Pratap Patil Chikhlikar : आज राज्यात दोन आंदोलनाची चर्चा होती, ती म्हणजे मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चाची. Bjp तर दुसरी पाकिस्तानी बिलावल भुट्टो यांच्याविरोधात भाजपने राज्यभरात केलेल्या आंदोलनाची. पण अशाच आंदोलनात बिलावल भुट्टोचा पुतळा जाळतांना नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हाताची बोटं भाजल्याचा प्रकार समोर आला आहे.

Mp Prataprao Patil Chikhlikar news, Nanded
Latur Political : विवाह सोहळ्यात कट्टर विरोधक एकत्र, घट्ट धरला एकमेकांचा हात..

पुतळा जाळतांना भडका उडाल्याने चिखलीकर (Prataprao Patil Chikhlikar) यांची दोन-तीन बोटं भाजली गेली. त्यावर उपचार करण्यात आले असून चिखलीकर त्यांच्या पुढील नियोजित कार्यक्रमात देखील हजर होते. (Nanded) पाकिस्तानी बिलावल भुट्टो याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कसाई असा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले.

त्याचा निषेध म्हणून राज्यात ठिकठिकाणी भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पाकिस्तान आणि बिलावलचा पुतळाही जाळण्यात आला. नांदेडच्या वजिराबाद भागात खासदार चिखलीकर यांच्या उपस्थितीत बिलावलचा पुतळा जाळण्यात येणार होता.

यासाठी कापडी पुतळा तयार करून तो जाळण्यासाठी पेट्रोलचा वापर करण्यात आला. खासदार चिखलीकर हे पुतळ्याच्या अगदी जवळ उभे असल्याने पुतळ्याने पेट घेतला तेव्हा एकदम भडका उडाला आणि यात चिखलीकरांच्या हाताची बोटं भाजली.

त्यानंतर चिखलीकरांवर ताबडतोब प्राथमिक उपचार करण्यात आले. पण पुर्वनियोजित कार्यक्रम रद्द न करता त्यांनी सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. कार्यकर्ते नाराज होवू नयेत म्हणून आपण एकही कार्यक्रम रद्द केला नसल्याचे चिखलीकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com