Marathwada News : नांदेडला दोनवेळा मुख्यमंत्री पद तरीही विकास झाला नाही, म्हणून चंद्रशेखर राव महाराष्ट्रात..

Nanded : सभेनंतर केसीआर यांचा बीआरएस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उतरण्याची शक्यता आहे.
Cm Chandrasekhar Rao-Ashok Chavan News, nanded
Cm Chandrasekhar Rao-Ashok Chavan News, nandedSarkarnama
Published on
Updated on

Nanded : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रात पाय रोवू पाहत आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी केआरएस यांची नांदेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यांची ही सभा म्हणजेच त्यांच्या पक्षाचा राज्याच्या राजकारणात प्रवेश असल्याचे बोलले जात आहे. (Nanded) नांदेडला दोनवेळा मुख्यमंत्रीपद मिळाले पण या जिल्ह्याचा विकास झाला नाही, त्यामुळेच तेलंगणामध्ये ज्या प्रकारे मुख्यमंत्री केसीआर यांनी गेल्या दोन टर्ममध्ये विकास केला, तसाच सीमावर्ती भागातील गावे आणि महाराष्ट्रात करण्याचा आमचा विचार आहे.

Cm Chandrasekhar Rao-Ashok Chavan News, nanded
Marathwada Teacher Consitituency : काळे चौथ्यांदा विक्रम करणार ? की भाजप धक्का देणार..

त्यासाठीच बीआरएस (भारत राष्ट्र समिती) देशाच्या राजकारणात उतरत असल्याचा दावा तेलंगणातील जहीराबादचे खासदार बी.बी. पाटील यांनी केला आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या सभेची तय्यारी आणि सभा स्थळाचे भुमीपूजन करण्यासाठी तेलंगणातील मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी नांदेडात येवून गेले. (Ashok Chavan) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळलेला असतांनाच नांदेड जिल्ह्यातील काही सीमावर्ती भागातील गावांनी तेंलगणा राज्यात समाविष्ट होण्याची मागणी केली होती. (Marathwada)

अशात तेलंगणाचा बीआरएस पक्ष नांदेडमधून महाराष्ट्रात दाखल होवू पाहत आहे. याकडे नांदेड जिल्ह्याचे सर्वेसर्वा नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कसे पाहतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. खासदार बी.बी. पाटील यांनी नांदेडला दोनदा मुख्यमंत्रीपद मिळाले पण विकास झाला नाही, हे केलेले विधान बरेच बोलके असून त्यांचे टार्गेट अशोक चव्हाण हेच असतील हे यावरून स्पष्ट होते.

तर दुसरीकडे अशोक चव्हाणांनी मात्र केसीआर यांच्या नांदेडमधील सभेकडे तटस्थपणे पाहण्याचे ठरवले आहे. उलट आपण केसीआर यांची भेट घेवून बाभळी धरण व इतर प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा करू, असे म्हणत सावध भूमिका घेतली आहे.

नांदेडमधील सभेनंतर केसीआर यांचा बीआरएस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी सध्या जरी केसीआर यांच्या सभेला आपण महत्व देत नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यांच्या हालचालींवर चव्हाणांचे बारीक लक्ष असणार आहे एवढे मात्र निश्चित..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com