Badnapur Assembly Election : विकासाची धमक असणाऱ्या उमेदवारालाच जनता आशीर्वाद देईल : नारायण कुचे

Narayan Kuche election rally speech : लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत यशस्वीरीत्या पोचविल्या; नारायण कुचे
Narayan Kuche Election Campaign
Narayan Kuche Election Campaign
Published on
Updated on

बदनापूर : महायुतीच्या सरकारने लोककल्याणकारी योजना राबवत सामान्य लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मी लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत यशस्वीरीत्या पोचविल्या आहेत. या मतदार संघातील जनता कायम विकासाच्या बाजूने कौल देत आली आहे. त्यामुळे विकास करण्याची धमक असणाऱ्या उमेदवारालाच मतदार विजयी करतील, असा विश्वास महायुतीचे उमेदवार तथा आमदार नारायण कुचे यांनी शुक्रवारी (ता. १५) व्यक्त केला.

जन आशीर्वाद दौऱ्यानिमित्त आमदार नारायण कुचे यांनी मतदारांसोबत संवाद साधला.आमदार कुचे म्हणाले की, बदनापूर मतदार संघातील जनतेने मला सलग दोनदा आमदार होण्याची संधी दिली. जनतेचा शिलेदार म्हणून मी लोकांचे प्रश्न सोडविण्यावर मतदार संघाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला.

केवळ निवडणुका आल्या म्हणून मी प्रचारात विकास केला म्हणून बोलत नाही. तर मतदार संघातील प्रत्येक गावाला कुठल्या न कुठल्या योजनेतून विकासकाम केले आहे, ते सर्वांना दिसते. अर्थात मतदार संघाचा नियोजनबध्द विकास करण्याचे माझे ध्येय आहे. महायुती एकसंधपणे काम करीत आहे. तर महाविकास आघाडीत सध्या नाराजी नाट्य सुरू आहे.त्यामुळे त्यांना मतदारांच्या प्रश्न, त्यांच्या समस्यांबाबत काहीच देणेघेणे नाही. ते केवळ एकमेकांची मनधरणी करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे नाराज झालेले कार्यकर्ते त्यांच्या प्रचारापासून दूर जात आहेत, अशी टीका आमदार नारायण कुचे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com