परभणी : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करणारे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह इतरांना पोलिसांनी मंगळवारी (ता.25) राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा कार्यालयासमोरून अटक केली. (Ncp) पालकमंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी (Nawab Malik) संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्या हस्ते परभणीत प्रजासत्ताकदिनाचे ध्वजारोहण करू नये, अशी मागणी भाजप (Bjp) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण केल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. मंगळवारी (ता.25) सकाळी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित कऱण्यात आली होती. या कार्यालयाच्या बाहेरच भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह इतरांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले.
पोलिसांनी तातडीने धाव घेत आंदोलकांवर कारवाई करत त्यांना अटक केली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे सध्या भाजपच्या निशाण्यावर आहेत. आर्यन खान प्रकरणापासून नवाब मलिक यांनी भाजपवर जी टीकेचीझोड सुरू केली आहे, त्याने भाजप पुरती हैराण झाली होती.
विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करतांना थेट मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे खळबळजनक आरोप देखील केले होते. नेमका हाच मुद्दा उपस्थित करत भाजपने प्रजासत्ताकदिनी नवाब मलिक यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहणास विरोध दर्शवला आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, संघटन सरचिटणीस अॅड.एन.डी.देशमुख, नगरसेवक मोकिंद खिल्लारे, माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, सरचिटणीस संजय रिझवानी, मंडळाध्यक्ष भीमराव वायवळ, तालुकाध्यक्ष संदीप जाधव, उपाध्यक्ष विजय गायकवाड, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास पवार, चिटणीस संतोष जाधव.
अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष अतीख पटेल, किसान मोर्चा संयोजक अंकुश आवरगंड, अनुसूचित जाती मोर्चा संयोजक उमेश शेळके, वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ.मनोज पोरवाल, कामगार आघाडी संयोजक रोहित जगदाळे, आध्यात्मिक आघाडी संयोजक संजय जोशी, संदीप शिंदे, दीपक शिंदे, माऊली कोपरे आदींचा यात समावेश आहे. या सर्वांना अक करून नंतर सोडून देण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.