Chhatrapti Sambhajinagar Crime : धक्कादायक! राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्याचा विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल

Crime News : पाण्यात गुंगीचे औषध पाजून...
Chhatrapti Sambhajinagar Crime
Chhatrapti Sambhajinagar Crime Sarkarnama

Chhatrapati Sambhaji Nagar News:राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याने एका महिलेला गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. तसेच अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करत संसार उध्वस्त करण्याची धमकी आरोपीनं दिली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी 33 वर्षीय पीडित महिलेनं तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे. मुख्तार खान उर्फ बब्बु (वय 42 वर्ष, रा. नूर कॉलनी, टाऊन हॉल परिसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Chhatrapti Sambhajinagar Crime
Sharad Pawar on Devendra Fadanvis: फडणवीसांना निपाणीतूनचं उत्तर देईल: 'त्या' टीकेवर पवार स्पष्टचं बोलले...

तक्रारीत काय म्हटलंय?

पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीत आरोपीनं पाण्यात गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं म्हटलं आहे. अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची आणि मुलांचे अपहरण व पतीला मारहाण करणे व तिच्याबद्दल चुकीची माहिती देऊन संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी आरोपीनं दिली होती.

संबंधित महिला रस्त्याने ये जा करत असताना आरोपी तिच्याकडून बघून अश्लील वर्तन करायचा. त्याकडे पीडितेनं दुर्लक्ष केल्यावर आरोपीनं तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेला गाठून तिच्या मुलांचे अपहरण व पतीला मारहाण करणे व तिच्याबद्दल चुकीची माहिती देऊन संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचं 33 वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे.

Chhatrapti Sambhajinagar Crime
Patole Vs Thackeray: जगतापांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे आघाडीत वादाची ठिणगी; पटोलेंचा ठाकरेंना थेट इशारा; म्हणाले...

या प्रकाराला कंटाळून विवाहितेला आरोपीने भेटण्यासाठी घरी येण्यास भाग पाडले. दरम्यान पीडित महिला जेव्हा घरी आली तेव्हा तिला मुख्तार याने तिला पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून प्यायला दिले. पाणी पिल्यावर महिला काही वेळाने अचानक बेशुद्ध झाली. त्याच अवस्थेत मुख्तार खानने पीडितेवर अनैसर्गिक अत्याचार केले.

गुन्हा दाखल होताच मुख्तार पसार...

राष्ट्रवादी काँग्रेस(Ncp)चा माजी पदाधिकारी असलेला आरोपी मुख्तार ऊर्फ बब्बू याच्याविरोधात पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) पोलिसांनी रविवारी( दि.7 मे) मध्यरात्री गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्तार फरार झाला आहे. त्याच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचा बोर्ड असून ते बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Chhatrapti Sambhajinagar Crime
Sharad Pawar News : शरद पवारांच्या खेळीने भाजपचा 'प्लॅन' कचऱ्याच्या टोपलीत ; पण, वारसदार नेमण्यात अपयशी...

राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण...

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुल्ला म्हणाले, मुख्तार खान ऊर्फ बब्बू नावाचा आमचा पदाधिकारी नाही. तो कार्यकर्ता असू शकतो. मात्र, त्याला सध्याच्या कार्यकारिणीत कोणतेही पद दिलेले नाही. मागील कार्यकारिणीचे नेमके सांगता येत नाही अशी माहिती मुल्ला यांनी दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com