Crime News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येत वाल्मीक कराड याचा हात असल्याचा आरोप आहे. खंडणी प्रकरणातून अपहरण आणि मग निर्घृण हत्येच्या गुन्ह्यात वाल्मीक कराड हा मुख्य आरोपी आहे. महादेव मुंडे यांचे मारेकरी आणि त्या मागचा मास्टर माईंड कराडच होता, असा दावा बाळा बांगर याने काही दिवसापुर्वी केला. त्यानंतर आता आणखी एका उपसरपंचाने वाल्मीक कराड गँगने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे आणि विधानसभेला राजेभाऊ देशमुख यांचे काम केले, या रागातून आपल्यावर कराड याच्या गुंडानी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप लिंबगावचे उपसरपंच तानाजी धुमाळ यांनी केला. आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) कार्यकर्ते असून 'तुतारी'चा प्रचार करत बजरंग सोनवणे आणि राजेभाऊ देशमुख यांना गावातून लीड मिळवून दिली होती.
याचा राग म्हणून माझ्यावर दोनवेळा जीवघेणा हल्ला करण्यात आला. आपल्या कुटुंबियांना या गुडांकडून संरक्षण मिळावे आणि वाल्मीक कराड व त्याच्या गँगवर कारवाई करावी, या मागणीसाठी उपसरपंच तानाजी धुमाळ आणि त्यांचा मुलगा आकाश हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. (walmik Karad) तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी देत वाल्मीक कराड याच्या गुंडाने आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप धुमाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
आमचे कुणीही काहीही करु शकत नाही, आम्ही वाल्मीक कराडची माणस आहोत, तुझा संतोष देशमुख केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्यावर दोन वेळा जिवघेणा हल्ला केला. मात्र, आरोपींचे स्थानिक पोलिसांशी संगणमत असल्याने त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. 9 मार्च व 25 मार्च रोजी याच आरोपींनी आपल्यावर जिवघेणा हल्ला केला.
दत्ता काळे, प्रकाश काळे, विकास काळे, सतीश काळे,राजेंद्र काळे व नितीन काळे यांची नावे धुमाळ यांनी निवेदनात नमूद केली आहेत. पोलिसांचे पाठबळ असल्याने आरोपी कायम आपल्या घराकडे चाकू, तलवारी घेऊन येतात व धमक्या देतात. आरोपींकडून आपल्या कुटुंबियांच्या जिविताला धोका असल्यामुळे आपल्या संरक्षण द्यावे आणि आरोपींवर कारवाई करावी, या मागणीसाठी तानाजी धुमाळ आणि आकाश धुमाळ यांनी आजपासून बेदमुत उपोषण सुरू केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.