Jitendra Awhad : 'रोझ डे'ला भेटले अन् प्रेम 'व्हॅलेंटाईन डे'ला बाहेर पडलं; जितेंद्र आव्हाडांचा मुंडे-धस भेटीवर टोला

NCP SharadChandra Pawar Party Jitendra Awhad Beed Minister Dhananjay Munde BJP MLA Suresh Dhas : मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्या भेटीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांची टोलेबाजी.
Jitendra Awhad
Jitendra Awhad sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजप आमदार सुरेश धस आणि त्यांच्या निशाणावर असलेले मंत्री धनंजय मुंडेंनी राज्याचे वातावरण ढवळून निघाले. पण या दोघा नेत्यांची भेटी समोर आली आहे. त्यावरून विरोधक या प्रकरणात चांगलेच आक्रमक झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. 'रोझ डे' भेटले अन् प्रेम 'व्हॅलेंटाईन डे'ला बाहेर पडलं आहे', असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री मुंडे अन् धस भेटीवर लगावला आहे.

बीडचे मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांची भेट झाल्याचे समोर आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट माझ्या उपस्थित झाल्याचे म्हटले आहे. यावरून राज्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. विरोधकांनी या भेटीवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Jitendra Awhad
New Income Tax Bill : नवीन इन्कम टॅक्स विधेयकाचा पॅन आणि आधार कार्डवर काय होणार परिणाम ?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या भेटीवर चांगलाच हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, "अगोदर 'रोझ-डे' असतो नंतर हा 'डे' असतो तो 'डे' असतो, यानंतर 'व्हॅलेंटाईन-डे' येत असतो. 'रोज डे'च्या दिवशी ते पुष्पगुच्छ घेऊन भेटले असतील आज 'व्हॅलेंटाईन-डे'ला बाहेर आलं आहे". सारे 'डे' साजरे केले असतील, असाही टोला आव्हाडांनी लगावला.

Jitendra Awhad
Top 10 New : मनोज जरांगेंचा सरकारला दिलासा, मुंडेंसोबत भेट झाली, सुरेश धसांची कबुली - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

आमदार आव्हाड यांनी या भेटीचे पुरते 'वस्रहरण' केले. 'तुम्ही शेतकऱ्यांना फसवता, कृषी खात्यात भ्रष्टाचार करणार, हार्वेस्टमध्ये वाल्मिक कराड तुमचे पैसे जमा करणार, तुमच्या बंगल्यामध्ये बैठका होणार, वाल्मिक कराड तुमचा माणूस आणि तो मर्डर करणार, निवडणुकीदरम्यान कैलास फड माणूस पूर्ण बूथ कॅप्चर करतो. तो तुमचा खास माणूस त्याच्यावर गुन्हा नोंदवला जातो. तो तुमचा स्टेटस ठेवणार, पोलिस त्याचं गुन्ह्यामध्ये नावही घेत नाही', असा घणाघात आमदार आव्हाड यांनी केला.

आमदार आव्हाड यांनी या भेटी दोघांनी 'ये दोस्ती हम नही तोडेंगे', नाहीतर 'दोस्त दोस्त ना राहा, प्यार प्यार ना राहा', असे देखील गाणे म्हटले असेल. धस सध्या अतिशय क्षमाशील झालेत, संत झालेत, संत परंपरेवर वागू लागलेत. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला देखील त्यांनी सल्ला दिला की कोणी, असेल त्यांना माफ करुन टाका, तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ केले असेल, असा टोला देखील लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com