Jitendra Awhad : ''युद्धावेळी'च अजितदादा-सुरेश धस भेट, ...तर संशय येतोच'; जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं

NCP SharadChandra Pawar Party MLA Jitendra Awhad BJP MLA Suresh Dhas DCM Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतलेल्या भेटीवर आमदार जितेंद्र आव्हाडांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.
Jitendra Awhad 3
Jitendra Awhad 3Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस आक्रमक आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर त्यांनी थेट आरोप करत आहेत. सध्या वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत आहे.

मंत्री मुंडे यांच्या विरोधात राजकीय धार वाढवली असतानाच भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या भेटीवर निशाणा साधला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी, 'जेव्हा युद्ध सुरू असते, तेव्हा आपल्या सैन्यानं समोरच्या सेनापतीला जाऊन भेटायचं नसतं. राजकारण जरी असलं, तरी त्यांच्या घरी जाऊन जेवलो, तर संशय घेणारच ना!', असा टोला लगावला.

Jitendra Awhad 3
Jitendra Awhad : 'वाल्मिक कराड 'विकृत', 'सायकोपॅथ', 'सीरियल किलर''; आमदार आव्हाडांचा बीडमधील दहा वर्षांतल्या हत्यांबाबतच्या दाव्यानं खळबळ

बीडचे (BEED) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजप आमदार सुरेश धस या प्रकरणात दररोज वेगवेगळे गौप्यस्फोट करत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप करत आहे. मंत्री मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा यात थेट संबंध असल्याचा आरोप करत आहेत. यातून आमदार धस यांनी मंत्री मुंडे यांना चोहो बाजूनी घेरलं आहे. यातून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढला आहे.

Jitendra Awhad 3
Jitendra Awhad : आमदार आव्हाडांची रामगिरी महाराजांवर 'सटकली'; म्हणाले, 'अति व्हायला लागलं, आता जोड्यानं...'

छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल यांच्याकडे गेलेल्या बीडमधील आमदारांच्या शिष्टमंडळांनी देखील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या शिष्टमंडळात भाजप आमदार धस देखील होते. या प्रकरणात राज्यातील काही भागात मोर्चे निघत आहेत. या प्रत्येक मोर्चात आमदार धस आक्रमक भाषण करत आहेत. प्रत्येक मुद्यावर मंत्री मुंडे यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा करत असतानाच, आमदार धस यांनी मंत्री मुंडे यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

अजितदादांची आमदार धस यांनी घेतलेली ही भेटीवर संशयकल्लोळ वाढला आहे. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधत, या भेटीविषयी भाष्य करताना, अधिकच संशय व्यक्त केला. आमदार धस यांनी अजितदादांची ही भेट बीडमधील काही पतसंस्थांनी 16 लाख गुंतवणूकदारांचे नुकसान केले, त्याविषयी तक्रार करण्यासाठी आणि त्यावर मार्ग निघावा या उद्देशाने होती, असे सांगितले. या भेटीनंतर आमदार धस यांनी वाल्मिक कराड याने एका पतसंस्थेकडून कसे पैसे उकळले, याविषयी गौप्यस्फोट केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com