
Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत तपास करत असलेले बीड पोलिस, सीआयडी आणि एसआयडीच्या कामकाजावर असमाधान व्यक्त करताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संताप व्यक्त केला.
'मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला शांत झोप येतेच कशी? आमच्या सारख्यांना जमिनीनं उचलून फेकलं, असतं', असा घणाघात खासदार सोनवणे यांनी केला.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर समाधानी नसल्याचं, खंडणीच्या गुन्ह्यातील (Crime) वाल्मिक कराड याला 'मोकाका'मध्ये आरोपी न केल्यावरून मस्साजोग ग्रामस्थं आक्रमक आहे. मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करतो, अशी आज भूमिका घेतली होती. त्यामुळे आज दिवसभर मस्साजोगमध्ये तणावाचे वातावरण होते.
खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत, हाच मुद्दा पकडत आणि पोलिस यंत्रणेच्या आतापर्यंतच्या तपासावर असमाधानीपणा व्यक्त करत, सीआयडींनी या प्रकरणात ज्यांना तपासले आहे, त्यात पैसा कोणाच्या खात्यावर कोणाकडे गेला आहे, त्यांची नावं महाराष्ट्रसमोर आलं पाहिजे. खंडणीखोर आरोपी 'मोकाका'मध्ये आला पाहिजे. धनंजय देशमुख यांनी आज जे आंदोलन केले आहे, त्याच्याबरोबर त्याचं अख्खं गाव आहे. लोकसभेचा सदस्य म्हणून मी त्याच्याबरोबर आहे. समाजातील सर्वच त्याच्याबरोबर आहे, न्यायासाठी त्याच्याबरोबर आहोत. सर्व आरोपी 'मोकाका'मध्ये आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देताना खासदास सोनवणे म्हणाले, "मुख्यमंत्री साहेब आम्ही शांत आहोत. आम्ही संयमानं घेतलं आहे. तसंच चलू द्या. ही आणू देऊ नका. संतोष देशमुख यांच्या हत्या झाली. धनंजय देशमुख न्यायासाठी टाकीवर चढला, उद्या अख्खं गाव आत्मदहन करणार असे म्हणतोय, तरी पण तुम्हाला झोप येते शांत! मी जर त्या ठिकाणी असतो, तर मला जमिनीनं उचलून टाकलं असतं. यांना काही संवेदनशीलताच नाही. हे काहीच करत असं वाटतं, असा मला संशय आहे".
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशी करत असलेल्या सध्याच्या यंत्रणेवर समाधानी नसलेले खासदार बजरंग सोनवणे, पुढच्या तपासासाठी मोठी पाऊल उचललं आहे. सीबीआय चौकशी देण्याची मागणी आपण करत आहोत. तसे पत्र तयार आहे, आणि लवकरच याबाबत पाठपुरावा सुरू करणार आहे. याशिवाय दक्षता आयोगाकडे देखील तक्रार करणार, असल्याचे खासदार सोनवणे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.