Beed News, 15 August : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी चांगलीच फटकेबाजी केली आहे.
40 पैसेवाले लावरीस भक्त महिलांना विचारताहेत पैसे खात्यावर पडले का? पण शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर 32 लाख अर्ज दाखल झाल्याची नोंद असून 19 अर्ज मंजूर झाल्याचे वेबसाईटवरील आकडीवारी कोल्हे यांनी थेट उपस्थितांना आपल्या मोबाईलवरून दाखविली.
तसंच जर ही आकडेवारी जर चूक असेल तर शासनाचे वेबसाईट अपडेट करावी, असे आवाहन देखील कोल्हे यांनी यावेळी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' गुरुवारी बीड जिल्ह्यातील केजमध्ये पोहोचली, यावेळी बोलताना त्यांनी युतीच्या योजनेवरुन सरकारवर हल्लाबोल केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार बजरंग सोनवणे, युवक आघाडीचे महेबूब शेख, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, मिशन आघाडीच्या पूजा मोरे, पृथ्वीराज साठे, उषा दराडे यांच्यासह इतर नेते पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गद्दारी खपवून घेणार नाही असे सांगितले आहे, असं म्हणत राज्यात भाजपने (BJP) गद्दारी केल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला. भाजपच्या डाव्या व उजव्या मांडीवर बसलेल्यांना निवडणुकीत जागा दाखवा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. आमदार, खासदार आणि मंत्री देखील विकत घेता येतात हे भाजपने दाखविलं आहे, असंही कोल्हे यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.