Aurangabad News: मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. पक्षांतर्गत विरोध डावलून (Ajit Pawar) अजित पवारांनी काळे यांच्यावरच विश्वास दाखवला. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः औरंगाबादेत आले. शिक्षक मेळावा घेतला, पण विक्रम काळे यांच्या मनात आपल्याला मंत्रीपद न मिळाल्याची सल कायम असल्याचे पुन्हा दिसून आले.
यापुर्वी देखील विक्रम काळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या समोर आपल्या मनातील खदखद आणि सुप्त इच्छा जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे. (Ncp) आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित शिक्षक मेळाव्यात पुन्हा काळे यांनी मंत्रीपदाचा राग आळवला, तेव्हा अजित पवारांनी डोक्यावर हात मारून घेतला. (Marathwada)
विक्रम काळे म्हणाले, राज्यात आपली सत्ता आली तेव्हा एक गडी कोट घालून आला आणि मंत्री झाला, पण आम्ही तीन तीन टर्म आमदार असूनही आमचा नंबर लागला नाही. असो आता पुन्हा सत्ता आली की आधी मोठा भाऊ म्हणून सतीश चव्हाण साहेबांचे बघा अन् नंतर जमलं तर माझंही बघा. विक्रम काळे यांच्या या विधाननंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली.
मला मंत्रीपद मिळाले नाही यात दादांची चूक नाही, दादांनी मला उस्मानाबादची उमेदवारी दिली होती. पण मी घेतली नाही, त्यामुळे मला मंत्रीपद मिळाले नाही, अशी कबुलीही काळे यांनी यावेळी दिली. मराठवाडा पदवीधरचे सतीश चव्हाण हे सलग तीन टर्म निवडून आले आहेत. तर विक्रम काळे आता चौथ्यांदा शिक्षक मतदारसंघातून लढत आहेत.
आपल्या मंत्रीपद मिळावे ही त्यांची इच्छा कायम आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या घाईगडबडीत देखील काळेंनी सतीश चव्हाण आणि स्वतःच्या मंत्रीपदासाठीची आठवण अजित पवारांना करून दिली. काळेंच्या या टायमिंगची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.