Gangapur Assembly Constituency : गंगापूरमधून लढण्याचे सतीश चव्हाण यांचे स्वप्न महायुतीमुळे भंगणार ?

NCP's Satish Chavan's dream will be shattered : आगामी विधानसभा निवडणुक महायुती एकत्रितपणे लढणार आहे. आमदार सतीश चव्हाण यांच्या गंगापूरमधून लढण्यात महायुतीचाच मोठा अडसर ठरणार आहे. गंगापूर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा आहे, शिवाय विद्यमान आमदार प्रशांत बंब हे या मतदारसंघाचे सलग तीन टर्म प्रतिनिधित्व करत आहेत.
MLA Prashant Bamb-Satish Chavan
MLA Prashant Bamb-Satish ChavanSarkarnama
Published on
Updated on

NCP Ajit Pawar News : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक मतदारंसघात यावेळी नवे चेहरे पहायला मिळू शकतात. विधानसभेच्या गंगापूर या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील विद्यमान आमदार सतीश चव्हाण गेल्या दोन वर्षापासून तयारी करत आहेत.

मराठवाड्यातील पदवीधरांचे सलग तीन टर्म प्रतिनिधित्व करत असलेल्या चव्हाण यांना आता मागच्या दाराने नाही तर थेट मैदानात उतरून जिंकायचे आहे. यासाठी गंगापूरमधून तीन टर्म आमदार असलेल्या भाजप आमदार प्रशांत बंब (MLA Prashant Bamb) यांच्याविरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत. अनेक विकास कामे आणि त्यासाठी आपला निधी खर्च करत सतीश चव्हाण यांनी गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू केली.

अर्थात तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखंड होता, महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप सरकारचे विरोधक म्हणून राष्ट्रवादी भूमिका बजावत होती. पण अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तीसहून अधिक आमदारांनी बंड पुकारले आणि त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष आता सत्ताधारी आहे.

MLA Prashant Bamb-Satish Chavan
Prashant Bamb-Satish Chavan Politics : बंब यांच्या अष्टविनायक यात्रेला राष्ट्रवादीच्या चव्हाणांचे निधीतून प्रत्युत्तर...

अजित पवार व त्यांचे अनेक मंत्री या सरकारमध्ये आहेत. (NCP) लोकसभा निवडणूक एकत्र लढलेल्या महायुतीला राज्यात फारसे यश मिळाले नसले तरी आगामी विधानसभा निवडणुक महायुती एकत्रितपणे लढणार आहे. आमदार सतीश चव्हाण यांच्या गंगापूरमधून लढण्यात महायुतीचाच मोठा अडसर ठरणार आहे. गंगापूर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा आहे, शिवाय विद्यमान आमदार प्रशांत बंब हे या मतदारसंघाचे सलग तीन टर्म प्रतिनिधित्व करत आहेत.

ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओखळले जातात. त्यामुळे महायुतीत हा मतदारसंघ भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाला सुटण्याची शक्यताच नाही. तरीही सतीश चव्हाण यांचे या मतदारसंघात काम सुरूच आहे. सतीश चव्हाण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

MLA Prashant Bamb-Satish Chavan
MLA Prashant Bamb : निवडणूक भुमरेंची तयारी बंब यांच्या विधानसभेची...

राष्ट्रवादीची दोन वर्षापासून तयारी..

राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत होती, तेव्हापासूनच सतीश चव्हाण यांना गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून तयारी करण्यास सांगण्यात आले होते. लोकसभा निवडणकीत मराठवाड्यासह राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरला. महायुतीच्या विरोधात हा समाज गेल्याने राज्यात महायुतीची पिछेहाट झाली. मराठवाड्यातील एकमेव छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीला जिंकता आली.

या पार्श्वभूमीवर काही दिवसापुर्वी आमदार सतीश चव्हाण यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीत गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात मदत व्हावी, या हेतूने ही भेट घेण्यात आल्याची चर्चा होती. मात्र राष्ट्रवादीत फूट पडून विरोधात असलेले अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार सत्तेत सहभागी झाले.

आता राज्यात महायुती आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यातील एक घटक पक्ष असल्याने सतीश चव्हाण यांच्या तयारीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघामध्ये अदलाबदल होण्याची शक्यता असली तरी सलग तीन वेळा जिंकलेल्या मतदारसंघावर भाजप कुठल्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही, हे उघड आहे. त्यामुळे सतीश चव्हाण यांच्या तयारीचे काय? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. दुसरीकडे प्रशांत बंब यांनी मात्र जोरदार तयारी सुरू केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com