Grampanchyat Election : परभणी जिल्ह्यात ना भाजप, ना शिंदेसेना ; काॅंग्रेस-राष्ट्रवादीची बाजी..

पालम तालुक्यातील उमरथडी ग्रामपंचायतीत गंगाखेडचे रासपचे आमदार डाॅ. रत्नाकर गुट्टे यांना पाच जागा निवडून आणता आल्या असल्या तरी दोन सदस्य असलेल्या राष्ट्रवादीने इथे सरपंच पद पटकावत त्यांना दणका दिला. (Parbhani)
Grampanchayat Election News Parbhani
Grampanchayat Election News ParbhaniSarkarnama

परभणी : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतरच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. काही भागात भाजप, शिंदे गटाने चांगले यश मिळवले आहे, तर काही ठिकाणी त्यांची पाटी कोरी राहिल्याचे दिसून आले. मराठवाड्यातील (Parbhani) परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील उमरथडी आणि जिंतुर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchayat Election) काॅंग्रेस-राष्ट्रवादीने बाजी मारत सरपंच पद पटकावले आहे.

उमरथडी ग्रामपंचायत निवडणुकीत ७ पैकी पाच जागा रासपला तर दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. तरी देखील सरपंच पद राष्ट्रवादीने पटकावले. (Marathwada) संगिता पाथरकर या सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत. तर तिकडे जिंतुर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतीत एकुण १७ पैकी भाजप व काॅंग्रेसला प्रत्येकी सात तर राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या. या ठिकाणी काॅंग्रेसच्या मोबिन कुरेशी यांची सरपंच पदी निवड करण्यात आली आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर परभणी जिल्हा ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला. या जिल्ह्यात फोडाफोडीला स्थान मिळाले नाही. जिल्ह्याचा खासदार आणि परभणी शहराचा आमदार हे दोघेही शिवसेनेचे आहेत. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक राजकारण उजवे ठरते. उमरथडी ग्रामपंचायतीत गंगाखेडचे रासपचे आमदार डाॅ. रत्नाकर गुट्टे यांना पाच जागा निवडून आणता आल्या असल्या तरी दोन सदस्य असलेल्या राष्ट्रवादीने इथे सरपंच पद पटकावत त्यांना दणका दिला.

Grampanchayat Election News Parbhani
Gram Panchayat Election 2022 : आज 547 ग्रामपंचायतींना गावकारभारी मिळणार

तर जिंतुर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतीमध्ये भाजप आणि काॅंग्रेसला प्रत्येकी ७ जागा मिळाल्या, पण सरपंच पद काॅंग्रेसच्या वाट्याला गेले. इथे जिंतुरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांना फटका बसला आहे. विशेष म्हणजे शिवसेना, शिंदेसेना यांना या दोन्ही ग्रामपंचायतीत खाते देखील उघडता आलेले नाही. तिकडे शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना २, शिंदे गट, राष्ट्रवादी व इतर असे प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com