Nilanga Assembly Constituency : निलंग्यातील 'निष्ठावंत काँग्रेस' कार्यकर्त्यांची पावले चालती भाजपची वाट!

Big Congress leader joins BJP in Nilanga :निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे निष्ठावंत निलंगेकर यांना डावलून यावेळी वेगवेगळ्या पक्षातून उड्या घेणारे अभय साळुंके यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे वातवरण आहे.
Nilanga Assembly Constituency News
Nilanga Assembly Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : निलंगा विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत निलंगेकराना डावलून काँग्रेसकडून उप-यांना संधी दिल्याची खदखद अनेक निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. त्यामुळेच लातूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करत शहरासह ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बळ वाढत असल्याचे चित्र आहे.

संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्या प्रचाराला वेग आला असून त्यांचे बंधु अरविंद पाटील निलंगेकर हे नाराज असलेल्या काँग्रेस निष्ठावंत निलंगेकर कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून पक्षाची ताकद वाढवताना दिसत आहेत. निलंगा शहरातील माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे अतिशय विश्वासू समजले जाणारे नगरपालिकेत अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणारे माजी सभापती गोविंद शिंगाडे हा काँग्रेसचा हुकमी एक्काही भाजपच्या गळाला लागला आहे.

त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात काँग्रेसचे अवस्था बिकट होत असल्याची चर्चा आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे निष्ठावंत निलंगेकर यांना डावलून यावेळी वेगवेगळ्या पक्षातून उड्या घेणारे अभय साळुंके यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे वातवरण आहे. अपक्ष उमेदवारी दाखल केलेले अशोक पाटील निलंगेकर यांनी माघार घेत काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार असे जाहीर केले. मात्र निलंगेकर यांना डावलल्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये असलेली खदखद कायम आहे.

Nilanga Assembly Constituency News
Sambhaji Patil Nilangekar : जात पडताळणीचा प्रश्न महायुतीच निकाली काढेल, संभाजी पाटील निलंगेकर यांचे आश्वासन

काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर असून निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा ओघ सुरू झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके व भाजप उमेदवार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात निलंगा मतदारसंघात लढत होत आहे. (BJP) भाजपकडून शेतकऱ्यांना मोफत वीज, एक रूपयात पीक विमा, लडकी बहीण योजना, बचत गटाना सबळ अर्थ सहाय्य, हायवेचे परिसरात निर्माण झालेले जाळे, आंबुलगा येथील साखर कारखान्याचा भाव, निलंगा शहरासह मतदार संघात मिळालेला निधी हा भाजपने प्रचाराचा प्रमुख मुद्दा करत काँग्रेसची कोंडी केल्याचे बोलले जाते.

भाजपने लातूर येथे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिल्यामुळे जातीय समीकरणाचे गणित बदलले आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातील लिंगायत समाज भाजपाकडे झुकल्याचे चित्र यामुळे निर्माण झाल्याचा दावा केला जातोय. काँग्रेसचे माजी सभापती गोविंद शिंगाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मतदारसंघातील वातावरण बदलले आहे. ग्रामीण भागातील अनेक तरुण व मुस्लिम समाजाचे कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com