Sambhaji Patil Nilangekar : संभाजी पाटील निलंगेकरांची मंत्रीपदी वर्णी लागणार, निलंग्याच्या वाट्याला पुन्हा 'लाल दिवा'?

Nilanga Politics : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार आणि कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच आता निलंगा विधानसभा मतदारसंघातून माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव संभाव्य मंत्री म्हणून चर्चेत आहे.
Sambhaji Patil Nilangekar
Sambhaji Patil NilangekarSarkarnama
Published on
Updated on

Nilanga News, 28 Nov : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार आणि कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच आता निलंगा विधानसभा मतदारसंघातून माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांचे नाव संभाव्य मंत्री म्हणून चर्चेत आहे.

जेष्ठ आमदार म्हणून त्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता निलंग्याला पुन्हा मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील जातीय समि‍करणाचा विचार करता आणि लातूरचे स्थानिक नेतृत्व आणि पालकमंत्री म्हणून त्यांचं मंत्रीपद निश्चित मानलं जात आहे.

निलंगा (Nilanga) देवणी व शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्याचा समावेश या मतदारसंघात असून राजकीयदृष्या हा संवेदनशील मतदारसंघ आहे. या मतदारसंघाला अनेकदा राज्याच्या सत्तेमध्ये नेतृत्वाची संधी मिळाली आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी अनेक वर्ष मंत्रिमंडळात काम केलं आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे.

Sambhaji Patil Nilangekar
Shahajibapu Patil : "मी भिताड आहे का पूल?" पराभवानंतर शहाजीबापू पहिल्यांदाच बोलले, ठाकरेंचा घेतला समाचार

त्यांच्यानंतर संभाजीराव पाटील यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चौथ्यांदा विजय मिळवला आहे. राज्यात भाजप महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संभाजी पाटील निलंगेकर यांचे मंत्रीपद निश्चित मानले जात आहे. यापूर्वी लातूरचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना संधी देण्यात आली होती.

मात्र, त्यांच्याकडून लातूरसाठी (Latur) फारसा वेळ मिळाला नसल्याची ओरड सुरू होती. त्यामुळे स्थानिक आमदार मंत्री असल्याशिवाय या भागाचा विकास होणार नाही. तसेच लातूर शहराची जागा वगळता एकूण 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 विधानसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळालं आहे. त्यामुळे इथे स्थानिक पालकमंत्रीच असणं गरजेचे मानलं जात आहे.

त्यामुळे जेष्ठ आमदार म्हणून संभाजी पाटील (Sambhaji Patil Nilangekar) यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर याआधी ते पालकमंत्री असताना लातूर जिल्ह्यासह अन्य मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. विकासाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं.

Sambhaji Patil Nilangekar
Priyanka Gandhi : केरळची पारंपरिक कसावू साडी अन् हातात संविधान..! प्रियांका गांधींची लोकसभेतील पहिली 'एन्ट्री' चर्चेत

तर आता निवडणुकीच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या चर्चेत संभाजी पाटील निलंगेकर जेष्ठ आमदार असल्यामुळे आणि याआधी त्यांनी थेट कॅबिनेट मंत्री व लातूरचे पालकमंत्री म्हणून सक्षमपणे कामगिरी बजावल्यामुळे त्यांची पुन्हा एकदा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com