Manoj Jarange Arakshan : उपोषणाचा नववा दिवस; मनोज जरांगेची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी लावले सलाईन...

Manoj Jarange On Maratha Arakshan News : आधी जीआर मगच माघार, जरांगे उपोषणावर ठाम..
Manoj Jarange
Manoj Jarangesarkarnama
Published on
Updated on

Jalna News : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा अजूनही सुरू आहे. जरांगे यांचा उपोषणाचा आज नववा दिवस आहे. काल आठव्यादिवशीपासून त्यांनी पाण्याचाही त्याग केला आहे. जरांगे यांच्या प्रकृतीच्या तपासासाठी डॉक्टरांचं एक पथक गावातच आहे. प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावलं आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाली आहे. शुगर लेव्हलही कमी होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सलाईन लावण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange
Kolhapur Politics : 'फडणवीस माफीनामा नको, राजीनामा द्या'; कोल्हापुरात मराठा आंदोलकांची आग्रही मागणी !

जरांगे पाटील हे काल उपोषणाच्या आठव्या दिवशी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधू शकत होते. मात्र आज नवव्या दिवशी त्यांना तीव्र अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे त्यांना आता डॉक्टरांनी सलाईन लावले आहे. यावेळी डॉक्टर म्हणाले, "त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. पोटात अन्न-पाणी नसल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या त्यांना जाणवत आहे. मात्र त्यांची प्रकृती आणखी जास्त खालावू नये म्हणून आम्ही त्यांना सलाईन देतोय. आमच्या विनंतीनुसार त्यांनी सलाईन लावून घेतली आहे. त्यांची शुगर लेव्हल आणि रक्तदाब कमी झालेला आहे."

Manoj Jarange
Manoj Jarange Patil News : '' आरक्षण मिळेल नाहीतर, माझी अंत्ययात्रा...''; जरांगे पाटलांनी सरकारची मागणी दुसऱ्यांदा धुडकावली

जरांगे यांच्या उपोषणाच्या आज नवव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला चार दिवसांचा अल्टीमेटम दिलेला आहे. या आंदोलनाची आणि सरकारपातळीवर मागण्यांची पुढची दिशा काय असणार आहे? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. आजही राज्य सरकारचं शिष्टमंडळ आंदोलनस्थळी जरांगे यांची भेट घेणार आहे. आज काय निर्णय होतो, हेही पाहणं महत्त्वाचं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com