Police Officer Transfer News: नितीन बगाटे रत्नागिरीचे एसपी, तर त्यांच्या जागी उपायुक्तपदी सोमय मुंडे!

Nitin Bagate has been transferred from Sambhajinagar to Ratnagiri as Superintendent of Police, while Somaya Munde steps in as the new Deputy Commissioner. :देगलूर येथे जन्मलेले मुंडे यांनी आयआयटी मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये दुहेरी पदवी प्राप्त केली आहे.
Sp Nitin Bagate-DCP Somay Munde News
Sp Nitin Bagate-DCP Somay Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस आयुक्तालय शहर परीमंडळ क्षेत्र 2 चे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांची रत्नागिरी पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय विनायक मुंडे हे शहर परीमंडळ 1 उपायुक्त पदी रूजू होणार आहेत.

राज्य गृह विभागाने 22 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश जारी केले. सांगलीच्या पोलीस अधीक्षक रितू भोकर यांची धाराशिव पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Police) छत्रपती संभाजीनगरचे नितीन बगाटे हे ग्रामीणच्या अधीक्षक पदासाठीही ते इच्छुक होते. मात्र, गुरूवारी निर्गमित आदेशात त्यांना रत्नागिरी पोलीस अधीक्षक पदी नियुक्तीचे आदेश निर्गमित झाले.

आयआयटीयन्स ते आयपीएस

आयपीएस अधिकारी सोमय मुंडे हे देगलूर येथील सर्जन विनायक आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मुक्ता मुंडे यांचे चिरंजीव आहेत. (Chhatrapati Sambhajinagar) वडील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील सनगाव येथील मूळ रहिवाशी असून, मुंडे कुटुंबिय वैद्यकीय व्यवसायानिमीत्त 40 वर्षांपासून देगलूर येथे स्थायिक आहेत. देगलूर येथे जन्मलेले मुंडे यांनी आयआयटी मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये दुहेरी पदवी प्राप्त केली आहे.

Sp Nitin Bagate-DCP Somay Munde News
Mumbai Police : मुंबई पोलीस दलात मोठा बदल; देवेन भारती CP होताच फडणवीसांनी स्वतःचाच निर्णय गुंडाळला

ते 2016 बॅच चे आयपीएस असून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसात प्रोबेशनरी म्हणून वैजापूर तालुक्यात त्यांनी काम केले. नंतर अमरावती येथे असिस्टंट एसपी, लातूरचे एसपी होण्यापूर्वी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षल ऑपरेशन्सचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. गुप्तचर आणि ऑपरेशन्स फ्रेमवर्क तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नक्षलवादी प्रदेशात एका विशेष मोहिमेचे नेतृत्व करताना त्यांनी 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे.

Sp Nitin Bagate-DCP Somay Munde News
Devendra Fadnavis On Marathwada Drought : मराठवाड्यातील आजच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला पहावा लागणार नाही! मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

अधिकारी कोठून -कोठे?

राकेश ओला- अहिल्यानगर येथून पोलीस उपायुक्त, मुंबई

सोमनाथ घार्गे - रायगड येथून अहिल्यानगर येथे पोलीस अधीक्षक

आंचल दलाल - पुणे येथून रायगड येथे पोलीस अधीक्षक

महेंद्र पांडीत- कोल्हापूर येथून पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

योगेश कुमार गुप्ता- नांदेड येथून कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक

बच्चन सिंह- अकोला येथून नागपूरला, रा.रा. पोलीस बल गट क्र. ४चे समादेशक

अर्चित चांडक- नागपूर शहर येथून अकोला येथे पोलीस अधीक्षक

मंगेश शिंदे- मुंबई येथून नागपूर लोहमार्ग येथे पोलीस अधीक्षक

राजतिलक रोशन- सहाय्यक पोलीस महासंचालक, मुंबई येथून मुंबई येथे पोलीस उपायुक्त

बाळासाहेब पाटील ः पालघर येथून नाशिक (ग्रामीण) येथे पोलीस अधीक्षक

यतीश देशमुख- गडचिरोली येथून पालघर येथे पोलीस अधीक्षक

सौरभ अगरवाल-सिंधुदुर्ग येथून पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस अधीक्षक

मोहन दहिकर- ठाणे शहर येथून सिंधुदुर्ग येथे पोलीस अधीक्षक

विश्व पानसरे- बुलढाणा येथून अमरावती येथे रा.रा. पोलीस बल गट क्र. ९ चे समादेशक

नीलेश तांबे- नागपूर येथून बुलढाणा येथे पोलीस अधिक्षक

समीर अस्लम शेख- सातारा येथून बृहनमुंबई येथे पोलीस उपायुक्त

तुषार दोषी- पुणे लोहमार्ग येथून सातारा येथे सातारा पोलीस अधीक्षक

सोमय मुंडे- लातूर पोलीस अधिक्षक येथून छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त परीमंडळ

जयंत मीणा- पुणे येथून लातूर येथे पोलीस अधीक्षक

नितीन बगाटे- छत्रपती संभाजीनगर येथून रत्नागिरी येथे पोलीस अधीक्षक

रितू खोकर- सांगली येथून जालना येथे पोलीस अधीक्षक

संजय वाघ-बदली करण्यात आली असून अद्याप पदस्थापना मिळाणे नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com