Marathwada : सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांना माहिती अधिकारात वेळेत माहिती न दिल्याबद्दल शिक्षेस पात्र झाल्याचा ठपका ठेवून राज्य माहिती आयोगाचे (State Information commissioner News) आयुक्त राहुल पांडे यांनी सिल्लोडचे नायब तहसिलदार किरण कुलकर्णी यांना २० हजार रुपये शास्ती ठोठावली आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जवाबदारी आयोगाने जिल्हाधिकार्यांवर सोपवली आहे. महेश शंकरपेल्ली यांनी तहसील कार्यालय सिल्लोड येथे १९ जून २०२० रोजी लेखी अर्ज देऊन सिल्लोड (Sillod) शहर हद्दीतील मालमत्ता सर्वे क्रमांक १२७/३ महसूल गाव नमुना सात बारा (७/१२) उतारा व इतर शासकीय अभिलेखाशी संबंधित सर्व प्रकारची कार्यालयीन कागदोपत्री माहिती मिळावी यासाठी केंद्रीय माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज दाखल केला होता.
परंतु त्यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे शंकरपेल्ली यांनी राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात अपील दाखल केले. (Aurangabad High Court) अपीलात सुनावणी झाली असता आयोगाने तहसील कार्यालयास लेखी खुलासा करण्याची सूचना केली. (Marathwada) तत्कालीन नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांनी राज्य माहिती आयोगात खुलासा सादर केला.
अर्ज केल्याच्या काळात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे व कर्मचार्यांची ५० टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती नसल्याने नियमित सुनावण्या न झाल्यामुळे ही माहिती देता आली नाही. नायब तहसिलदारांच्या या खुलाशावर राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांचे समाधान झाले नाही. त्यांनी तत्कालीन जन माहिती अधिकारी किरण कुलकर्णी यांना २० हजार रुपये शास्ती लावली. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जवाबदारी जिल्हाधिकार्यांवर निश्चित करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.