
Mumbai News : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया बीडमधील राजकारणातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रचंड अॅक्टिव्ह आहेत.
धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना नियमबाह्य प्रक्रिया राबवून तब्बल 248 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी अंजली दमानिया यांना सल्ला देताना खोचक टोले लगावले आहेत.
ओबीसी (OBC) आंदोलक लक्ष्मण हाके यांनी अंजली दमानिया यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात असलेले पुरावे घेऊन कोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे. जालन्यातील एका कार्यक्रमात लक्ष्मण हाके सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
'अंजली दमानिया (Anjali Damania) सनसनाटी असून मीडियामध्ये स्पेसच्या शोधासाठी असलेला एक चेहरा आहे. त्यामुळे मी त्यांना सामाजिक कार्यकर्ता मानत नाही. यापुढेही जाऊन सांगतो उद्यापासून त्यांना अंजलीताई दलालिया, असं उद्यापासून ओळखण्यात यावं', असा घणाघात देखील लक्ष्मण हाके यांनी केला.
भगवान गडावरील महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनात विधान केले होते. त्यावर अंजली दमानिया यांनी लवकरच नामदेव शास्त्री महाराज यांची पुरावे घेऊन भेट घेणार आहे, असे म्हटले होते. त्यावर पुरावे तिथे नेऊन काय उपयोग आहे. पुरावे तुम्ही न्यायालयात घेऊन जा. किमान शिक्षा तरी भेटेल, असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावला.
'पुरावे जर तुम्ही कोर्टात घेऊन गेलात, तर त्याची छाननी होईल. त्या मधील लॉजिक तपासले जाईल. म्ही भगवानगडावर पुरावे घेऊन जाऊन काय करणार आहात?', असा सवाल लक्ष्मण हाके यांनी अंजली दमानिया यांना विचारला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.