
Sharad Pawar Ajit Pawar reunion : ठाकरे बंधूंनी मनोमीलनाची एकमेकांना टाळी दिली. तर दुसरीकडं शरद पवारसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अलीकडच्या काळात चौथ्यांदा भेट झाली.
या दोन्ही घडामोडींवर महाराष्ट्र राज्याचं राजकारण पुन्हा ढवळून निघू लागलं असून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून लक्ष्मण हाकेंनी राज्यात ओबीसी (OBC) आरक्षण बचाव संघर्षात सहभागी झाले. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनानं महाराष्ट्र ढवळून निघत असतानाच, लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण केलं होतं.
लक्ष्मण हाके यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण ओबीसी नेते म्हणून समोर आले. ओबीसीसह मराठा आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत, तर ते शरद पवार (Sharad Pawar) आहे, असा पहिल्यापासून लक्ष्मण हाके यांचा आरोप आहे. यातून ते पवार कुटुंबांबरोबर संघर्ष करत असतात.
ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाच्या चर्चेनंतर, शरद पवार आणि अजित पवार यांच्या देखील भेटी वाढल्या आहेत. अलीकडे दोन्ही पवार चौथ्यांदा भेटले आहेत. त्यावरून ठाकरेंबरोबर पवार कुटुंब महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी कुठे आहे, मी ती राष्ट्रवादी वेगळी मनातच नाही, ती एकच आहे. पवार कुटुंब कधीच वेगळं नव्हतं. अजितदादांचा पहाटेचा शपथविधी असो की, आता जाऊन भाजपला मिळणं असो. पवार कुटुंबियांनी महाराष्ट्राला वेडात काढण्याचे काम आजपर्यंत केलं आहे. पवार कुटुंबियांनी आजपर्यंत एकही चळवळ लढली नाही, असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.