OBC Reservation: ओबीसी महाएल्गार सभेपूर्वीचं भुजबळ, मुंडे, वडेट्टीवार, जानकरांचे बॅनर फाडले!

Beed Politics: बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा
OBC Reservation news
OBC Reservation newsSarkarnama
Published on
Updated on

Beed: अंबडमध्ये उद्या (शुक्रवारी) ओबीसी महाएल्गार सभा होत आहे. सभेपूर्वी येथील वातावरण तापलं आहे. सभेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विविध भागात ओबीसी नेत्याचे बॅनर लावले आहेत. गेवराई तालुक्यात असणाऱ्या बऱ्हाणपूर फाटा येथे लावलेले बॅनर काही समाजकंटकांनी फाडले आहेत.

या बॅनरवर ओबीसी नेते छगन भुजबळ, भाजप नेत्या पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, कल्याण आखाडे यांचे फोटो आहेत. उद्या सभा होणार असून त्यापूर्वीच बॅनर फाडल्याने ओबीसी समाजाने संताप व्यक्त केला आहे. बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

OBC Reservation news
Sangola Assembly Constituency : शहाजी बापू म्हणतात, मीच निवडून येणार; पण दीपक साळुंखेंना दिलेल्या शब्दाचं काय?

करमाळा तालुक्यातील वांगी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे बुधवारी आयोजन केले होते. सभेसाठी हजारो मराठा बांधव उपस्थित होते. रात्री आठ वाजता होणारी सभा पहाटे तीन वाजता सुरू झाली. तब्बल पाच ते सहा तास उशिराने सभा सुरू झाल्यानंतरही उपस्थितांनी जरांगेंचे जल्लोषात स्वागत केले.

उजनी धरणाच्या जवळ सभा असल्याने या भागात थंडीचे प्रमाण अधिक होते. तरीही परिसरातील मराठा बांधव सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. "प्रत्येक गावोगावी लोकांनी माझं स्वागत केलं, त्यामुळे येथे यायला उशीर झाला. मराठा समाज बांधव गाडीला आडवे पडून मला थांबवून माझे स्वागत करीत होते. त्यामुळे मला यायला उशीर झाला. इतक्या वेळानंतरही तुम्ही माझ्यासाठी बसून आहात. नक्कीच तुमच्या या सभेची महाराष्ट्र नोंद घेईल," असं सांगत जरांगे पाटलांनी सभेला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

OBC Reservation news
Maratha Reservation : हुडहुडी भरविणाऱ्या थंडीत पहाटे तीन वाजता जरांगेंच्या सभेसाठी तरुणांचा उत्साह कायम...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com