Marathwada News: कळमनुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Kalmnuri APMC News) सभापती आणि उपसभापती निवडीकरिता सोमवारी (ता. २२) बोलावलेली विशेष सभा पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रकृती बिघडल्याचे कारण देत ऐनवेळी रद्द केली. यामुळे संतप्त झालेल्या महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी याबाबत जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान प्राधिकृत अधिकाऱ्यांनी रद्द झालेली विशेष सभा गुरुवारी (ता. २५) बोलवण्यात आल्याचे पत्र काढले आहे. (Hingoli) कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीनंतर नवनिर्वाचित संचालकामधून सभापती आणि उपसभापती निवडीकरिता सोमवारी विशेष सभा बोलवण्यात आली होती. (Bjp) यावेळी या सभेकरिता प्राधिकृत अधिकारी म्हणून आसाराम गुसिंगे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या विशेष सभेमध्ये सभापती व उपसभापती पदाच्या निवडीकरिता बाजार समितीच्या सचिव व कर्मचाऱ्यांनी सर्व व्यवस्था करून ठेवली होती. (APMC Election) मात्र, ऐनवेळी विशेष सभेकरिता नियुक्त करण्यात आलेल्या प्राधिकृत अधिकारी गुसिंगे यांनी बाजार समितीच्या सचिवाच्या व्हॉट्सअपवर आज सकाळी दहा वाजता तब्येत बिघडल्याचे कारण देत आपण आज उपस्थित राहू शकत नसल्याचे कळवले.
त्यामुळे ही विशेष सभा तहकूब करावी व बाजार समितीच्या तरतुदीप्रमाणे गुरुवारी विशेष सभा आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. ऐनवेळी झालेल्या या प्रकारामुळे कर्मचाऱ्याप्रमाणे विशेष सभेसाठी सहलीवरून परतलेले नवनिर्वाचित संचालकही या प्रकारामुळे गोंधळून गेले. महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी या प्रकाराबाबत बाजार समितीतील सचिव व कर्मचाऱ्यांना विचारणा केली.
मात्र, त्यांच्याकडेही कुठलीही ठोस उत्तर नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. या प्रकाराबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अचानक तहकूब करण्यात आलेल्या विशेष सभेच्या प्रकरणी तक्रारी करून जाब विचारण्यात आला. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या पॅनलला या निवडणुकीत जोरदार दणका बसला होता. महाविकास आघाडीला १२ तर बांगर यांच्या भाजप-सेना युतीच्या पॅनलला फक्त पाच जागा जिंकता आल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.