राष्ट्रवादीत इनकमिंग : MIMसह विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी बांधले हाती घड्याळ!

आगामी महापलिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली बूथस्तरावर पक्षसंघटना मजबूत करण्याकडे लक्ष दिले आहे.
NCP
NCP sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आगामी महापलिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) आपली बूथस्तरावर पक्षसंघटना मजबूत करण्याकडे लक्ष दिले आहे. त्यातूनच विविध पक्षातील नेत्यांचे इनकमिंग राष्ट्रवादीत होत आहे. जिल्हास्तरावरील नेत्यांना राष्ट्रवादीत आणून आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत पक्ष मजबूत स्थितीत आणण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. लातूर माजी जिल्हा परिषद सदस्यांसह विविध नेत्यांनी, तर औरंगाबादमधील एमआयएमच्या (AIMIM) कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. (Officials and activists from various parties including MIM join NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लातूर जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यामध्ये लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंदन पाटील, बेळसांगवीचे माजी सरपंच विनायक पाटील, रिपब्लिकन पक्षाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष बालाजी गवळे, सोनवळाचे सरपंच राहुल सूर्यवंशी, उपसरपंच सुमीत राठाडे आणि अतनूर ग्रामपंचायतीचे सदस्य संगेवार प्रमोद यांचा समावेश आहे.

NCP
नाना पटोलेंचे पुन्हा वाद्‌ग्रस्त विधान : ‘ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं’!

या वेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर पाटील, लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, लातूर शहरचे जिल्हाध्यक्ष मकरंद सावे उपस्थित होते.

NCP
"अजितदादा म्हणतात लसीची सक्ती; राजेश टोपेंनी सांगितले घेण्यास भाग पाडू"

लातूरबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील एमआयएम पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी हाती राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणे पसंत केले आहे. त्यासाठी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी प्रयत्न केले. मुंबईतील राष्ट्रवादी भवनात प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा झाला. या वेळी औरंगाबाद जिल्ह्याचे संपर्क मंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

NCP
हा तुला शेवटचा चान्स, उपसरपंचपदाचा राजीनामा दे; नाहीतर...

एमआयएममधील फारुक शेख, सलमान खान, रजा खान, शोएब खान, शरीफ शेख, नदीम शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला. जयंत पाटील यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. पक्षात प्रवेश केलेल्या सर्व सहकाऱ्यांमुळे औरंगाबाद जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट होईल, अशा विश्वास व्यक्त करत पाटील यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com